Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh murder | मुलीने आईला मागून पकडलं आणि प्रियकराने तितक्यातच गळा चिरला…

घटनेनंतर प्रियकर गेल्यावर कोमलने आरडाओरडा सुरू केली. त्याचवेळी अनूपने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, रात्री त्याच्या बहिणीने ज्यूस प्यायला दिला होता, मात्र त्याची चव चांगली नसल्यामुळे त्याने ज्यूस प्यायलाच नाही.

Uttar Pradesh murder | मुलीने आईला मागून पकडलं आणि प्रियकराने तितक्यातच गळा चिरला...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 4:13 PM

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur) एका जोडप्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुन्नालाल उत्तम (61) आणि त्यांची पत्नी राज देवी (55) यांची हत्या त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलीनेच केली आहे. मंगळवारी आरोपी कोमलने आपल्या आई-वडिलांचा खून (Murder) करण्यासाठी प्रियकर रोहितची मदत घेतली, तिनेच सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. कानपूरचे पोलिस आयुक्त विजय सिंह मीना (Vijay Singh Meena) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोमलने स्वतः प्रियकरासाठी दरवाजा उघडला. एवढेच नाही तर तिने आई-वडिलांसह भाऊ अनूपची हत्या करण्याचे ठरवले होते.

कोमलने वडिलांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला

कोमलने वडिलांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात आत्महत्येचा मेसेजही टाकला होता. ही घटना यशस्वी करण्यासाठी ती रोहित आणि त्याचा भाऊ या दोघांसोबत प्रेमाचे नाटक करत होती. विजय सिंह म्हणाले, रोहितचा भाऊ राहुल हा मुंबई मिलिटरी इंटेलिजन्समध्ये रुग्णवाहिका कर्मचारी आहे आणि त्यानेच कोमलला बेशुद्ध होण्यासाठीचे आैषध आणून दिले होते. कोमलने तेच आैषध आई-वडील आणि भाऊ अनूप यांना ज्यूसमध्ये मिसळून दिले होते. मात्र, ज्यूसची चव चांगली नसल्याने अनूपने तो ज्यूस पिला नव्हता.

हे सुद्धा वाचा

कोमलच्या सांगण्यावरूनच प्रियकर रोहितने केली हत्या

कोमलचा प्रियकर रोहित म्हणाला, ‘मी कोमलच्या सांगण्यावरून हत्या केली. कोमलने फक्त दरवाजाच उघडला नाही तर तिने चाकूची देखील व्यवस्था केली होती. अगोदर वडिलांचा गळा कापला, नंतर आईचा गळा कापतांना मागून कोमलने आईला धरले. कोमलचा आणि तिच्या प्रियकराचा आई-वडिलांच्या संपत्तीवर डोळा होता. त्यामुळेच त्यांनी हे हत्याकांड घडवून आणले. आई-वडिल आणि भावाला ज्यूसमध्ये आैषध टाकून त्यांना बेशुद्ध करून प्रियकराला घरात कोमलने घेतले आणि आई-वडिलांचा खून केला.

ज्यूसमधुन बेशुद्ध होण्याचे आैषध आई-वडिल आणि भावाला दिले

घटनेनंतर प्रियकर गेल्यावर कोमलने आरडाओरडा सुरू केली. त्याचवेळी अनूपने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, रात्री त्याच्या बहिणीने ज्यूस प्यायला दिला होता, मात्र त्याची चव चांगली नसल्यामुळे त्याने ज्यूस प्यायलाच नाही. त्यानंतर काही वेळाने तो बेशुद्ध पडला. यापूर्वी कोमलने दिशाभूल करत पोलिसांना सांगितले की, ‘पप्पा बाहेर खोलीत झोपले होते. मी मधल्या खोलीत आईसोबत झोपले होते. भाऊ पहिल्या मजल्यावर झोपला होता. खून केव्हा झाला हे कळू शकले नाही. आवाज ऐकून मी डोळे उघडले तेव्हा मला 3 लोक दिसले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच कोमलने घडलेला सर्व प्रकार सांगून भांडाफोड केली.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.