भलाई का जमाना नहीं रहा ! इलाज करणाऱ्या डॉक्टरवरच रुग्णाचा हल्ला, चाकूने केले वार
कुटुंबियांशी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णावर उपचार सुरू असतानाच त्याने इलाज करणाऱ्या डॉक्टरवरच हल्ला केला आणि चाकूने वार करून तिची हत्या केली.
कोल्लम : केरळमधील कोट्टारक्करा येथील तालुका रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका व्यक्तीने बुधवारी एका 22 वर्षीय महिला डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या (Patient killed doctor) केली. या व्यक्तीने कुटुंबीयांना मारहाण केली होती, त्यात तोही जखमी झाला होता. म्हणून पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात उपचारांसाठी आणले होते. एक महिला डॉक्टर त्याच्या पायाच्या जखमेवर मलमपट्टी करत असताना आरोपी अचानक चिडला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकावर कात्री-चाकूने हल्ला केला, असे पोलिसांनी (police) सांगितले.
या हल्ल्यात तरुण डॉक्टर गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात आरोपींना रुग्णालयात आणणारे पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. जखमी डॉक्टर तरूणीला तिरुअनंतपुरममधील एका खाजगी रुग्णालयात नेले असता दुर्दैवाने तिथे तिचा मृत्यू झाला. आरोपीने त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला होता, असे कोट्टारक्करा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला जखमी अवस्थेत तालुका रुग्णालयात नेले. ‘ आरोपीने मद्यपान केले होते आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा तो हिंसक झाला होता. आम्हाला खोलीत प्रवेश न मिळाल्याने तो महिला डॉक्टरांसोबत एकटाच होता. डॉक्टर आरोपीच्या जखमेवर मलमपट्टी करत होते, तेव्हाच त्याने हल्ला केला. नंतर त्याला मोठ्या कष्टाने ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल केला जाईल. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या एका अधिकाऱ्याने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की ही एक दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे आणि केरळमधील डॉक्टर त्याचा निषेध करतील. IMA अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टर अझिझिया मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन होते आणि तिच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तालुका हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती.