मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारने उडवले, घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारने मागून धडक दिल्याने मॉर्निंग वॉकला गेलेला एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारने उडवले, घटना सीसीटीव्हीत कैद
मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारने उडवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:49 AM

पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळीराम बाबा गाढवे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी बीआरटी रोड लगत ही घटना घडली आहे.

भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली

बळीराम गाढवे हे नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकला गेले होते. डायमंड जिमसमोरील बीआरटी रोडवरुन रस्त्याच्या कडेने जात असतानाच मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात बळीराम हे हवेत उडून जमिनीवर आपटले. यात ते जखमी झाले. बळीराम यांच्या डोक्याला, डाव्या पायाला, हाताला, चेहऱ्याला मार लागला आहे.

अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

या अपघाताची वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अज्ञात कार चालकाविरोधात कलम 279, 338, 184, 119/177, 132 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नाईक निंबाळकर अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

पालघरमध्ये भरधाव कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

भरधाव कारचे टायर फुटल्याने पालघरमधील बोईसर रोडवर अपघातात नवविवाहित तरुणचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर कार चालक गंभीर जखमी असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.