सहा वर्षाच्या मुलाने वर्गात केला गोळीबार, पालकांसह शिक्षकांचं टेन्शन वाढलं
पहिलीच्या वर्गातील मुलाचा शाळेत गोळीबार, शिक्षिका जखमी, पालक टेन्शनमध्ये...
मु्ंबई : पहिलीच्या वर्गातील (Student) एका सहा वर्षाच्या मुलाने आपल्या शिक्षिकेला (teacher) गोळी मारली आहे. त्यामुळे शिक्षिका जब्बर जखमी झाली आहे. ही घटना अमेरिकेतील (USA) वर्जीनिया येथील आहे. ही घटना पोलिस आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी झाल्याचे सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रिचनेट एलीमेंट्री शाळेतील गोळीबारात कोणताही विद्यार्थी जखमी झालेला नाही. विशेष म्हणजे शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. शिक्षिकेवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येत सुधारणा झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.
पोलिसांनी मुलाकडची बंदुक हस्तगत केली आहे. त्याचबरोबर मुलाला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोळीबारमध्ये शिक्षिका सोडली तर कुणीही जखमी झालेलं नाही.
मुलाच्या आई-वडिलांना आणि मुलाला शाळेतील व्यायामशाळेच्या परिसरात भेटवण्यात आलं आहे. मुलाची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत अमेरिका देशात गोळीबार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर गोळीबाराच्या दुर्घटनेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मातेफिरु व्यक्ती असे अनेकदा हल्ले करीत आहेत.