हे तुमच्यासोबतही घडू शकतं… मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या कल्पनेत 10 किलोमीटर पायी चालत गेला… पुढे काय झालं?
तो मोबाईलवर गेम खेळत इथे आल्याचं तिला कळलं. त्यानंतर या महिलेने सोबत असलेल्या व्यक्तीला या मुलाला पोलिसांकडे देण्यास सांगितलं.
लातूर: तंत्रज्ञान चांगलं की वाईट यावर नेहमी चर्चा होत असते. कोणतंही तंत्रज्ञान कधी वाईट नसतं. तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा कसा? कशासाठी? आणि किती वापर करता यावर सर्व अवलंबून असतं. टेक्नॉलॉजीच्या किती आहारी जायचं हेही तुम्हाला कळलं पाहिजे. तरच त्याच्या होणाऱ्या नुकसानापासून सुटका होते. मोबाईलही अशाच टेक्नॉलॉजींपैकी एक आहे. हल्ली मुलांमध्ये मोबाईलचं वेड प्रचंड आहे. लहान मुलं सतत मोबाईलवर गेम खेळताना दिसतात. मोबाईलवर गेम खेळत असताना तहानभूकही विसरतात. लातूरमध्ये तर वेगळाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक विद्यार्थी मोबाईल खेळण्याच्या कल्पनेत एवढा तल्लीन झाली की तो एक दोन नव्हे तर चक्क 10 हा किलोमीटर पायी चालत गेला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मोबाईलवर खेळत नसतानाही केवळ मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या कल्पनेत एक अल्पवयीन विद्यार्थी पायी चालत गेला. मोबाईलच वेड असलेला हा विद्यार्थी जवळपास 10 किलो मीटरपर्यंत आपल्याच तंद्रीत पायी चालत गेल्याचा प्रकार लातूरमध्ये घडला आहे.
महापूर गावाजवळच्या मांजरा नदीच्या पुलावर हा अल्पवयीन विद्यार्थी थंडीत कुडकुडत असताना रात्रीला आढळला. त्यानंतर त्याच्या मोबाईलच्या वेडाचा हा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शिवाजी नगर पोलिसांनी त्याला त्याच्या बहिणीकडे सुपूर्द केले आहे.
बीड जिल्ह्यातले दोघे बहीणभाऊ लातूरमध्ये शिकायला आहे. दोघेही वेगवेगळ्या हॉस्टेलवर राहतात. त्यापैकी या अल्पवयीन मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडलं. त्यामुळे दिवसातले कैक तास तो मोबाईलवर खेळत असतो.
जेवण आणि आंघोळीचे भानही त्याला अनेकदा राहत नाही. त्याचे हे मोबाईल वेड पाहून त्याच्या बहिणीने त्याचा मोबाईल काढून घेतला होता. त्यानंतर तो मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या कल्पनेत लातूरवरून किमान 10 किमीपर्यंत चालत गेला.
हा मुलगा मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या कल्पनेत महापूर जवळच्या मांजरा नदीवर पायी चालत गेला. तिथेच तो अनेक तास थांबला. हा मुलगा पुलावर रेंगाळत असल्याचं एका महिलेने पाहिलं. या महिलेने त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिला धक्काच बसला.
तो मोबाईलवर गेम खेळत इथे आल्याचं तिला कळलं. त्यानंतर या महिलेने सोबत असलेल्या व्यक्तीला या मुलाला पोलिसांकडे देण्यास सांगितलं. त्यानंतर या व्यक्तीने या मुलाला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून सोडले आणि पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.
पोलिसांनीही त्याच्या बहिणीला बोलावून त्याला हॉस्टेलवर पाठवले. त्यामुळे तुमची मुलं जर मोबाईलवर गेमिंग करीत असतील तर त्यांना वेळीच आवरा. अनेक मुले मोबाईल शिवाय जेवणही करीत नाहीत. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. या घटनेतील मुलगा अल्पवयीन असल्याने त्याचे नाव किंवा फोटो वगैरे स्पष्ट करण्यात आलेले नाहीत.