AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेली होती, बराच वेळ परतली नाही म्हणून घरचे पहायला गेले तर…*

नेहमीप्रमाणे महिला खदाणीवर कपडे धुवायला गेली होती. मात्र बराच वेळ होऊन गेला तरी ती घरी परतली नाही. यामुळे घरचे लोक तिला बघायला खदाणीवर गेले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेली होती, बराच वेळ परतली नाही म्हणून घरचे पहायला गेले तर...*
कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार करुन तिची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 6:06 PM

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजूला असलेल्या खदाणीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यात तीन ते चार संशयितांचा समावेश असल्याची माहिती असून, दोघे जण फरार आहेत. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामण खोसकर, काँग्रेसचे अॅड. संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

नेहमीप्रमाणे कपडे धुवायला गेली ती परतलीच नाही

नेहमीप्रमाणे महिला खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी या महिलेला घेरले. यानंतर झटापट करून 20 फूट खड्ड्यात खाली पाडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही. यामुळे महिलेला पाहण्यासाठी घरातले खदाणीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे एक इसम घटनास्थळी दिसून आला. नागरिकांनी त्याला पकडून घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले.

विश्रामगृह परिसर बनला मद्यपींचा अड्डा

खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाचा परिसर मद्यपींचा अड्डाच बनला आहे. मात्र याकडे कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून, सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

नागरिकांचा घोटी पोलीस ठाण्याला घेराव

या घटनेनंतर सायंकाळी हजारो नागरिकांच्या जमावाने घोटी पोलीस ठाण्यात घेराव घातला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात दाखल होत संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. तसेच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप खेडकर यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त जमावाने केली.

पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षिका माधुरी कांगणे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.