Kalyan Women Rescued : भातसा नदीच्या काठावर चप्पल धुताना महिलेचा तोल गेला, जीवरक्षक पथकाने वाचवले प्राण

माहिती मिळताच गायकर यांनी कोणताही विलंब न करता भातसा नदी पात्राजवळ 10 मिनिटात घटनास्थळी बचाव उपकरणे, दोरी, जॅकेट घेऊन पोहचले. सुदैवाने नदिच्या पात्रातील खडकाचा आधार घेत महिला नदीच्या मध्यभागी प्रवाहात अडकली होती.

Kalyan Women Rescued : भातसा नदीच्या काठावर चप्पल धुताना महिलेचा तोल गेला, जीवरक्षक पथकाने वाचवले प्राण
भातसा धरणातून उद्या सकाळी पाण्याचा विसर्ग करण्यात येणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 5:39 PM

कल्याण : भातसा नदी (Bhatasa River) पात्राच्या काठावर उभी राहून सँडलला लागलेला चिखल साफ करताना तोल जावून महिला (Women) नदीच्या पात्रात पडल्याची घटना गरसे गावानजीक घडली. महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती. हे लक्षात येताच गरसे गावातील जीवरक्षक पथका (Lifeguard Squad)ने स्वतःच्या जीवची बाजी लावत त्या महिलेचे प्राण वाचवले आहेत. रेश्मा जाधव असे वाचवण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती टिटवाळा येथील रहिवासी आहे. सुदैवाने महिला नदीच्या मध्यभागी खडकाचा आधार घेत अडकल्याने वाचवण्यात यश आले आहे.

कुटुंबासह टिटवाळा येथे पाहुण्यांकडे आली होती महिला

रेश्मा जाधव या कुटुंबासह शहापूर तालुक्यातील एका गावात गेल्या होत्या. पाहुणचार घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जाधव कुटुंबीय पुन्हा टिटवाळा येथे घरी येण्यासाठी निघाले. यादरम्यान गरसे गावानजीक पुलावर निर्सगाचा आनंद घेण्यासाठी भातसा नदीच्या काठावर थोडा वेळ थांबण्याचा विचार त्यांनी केला. यावेळी त्यांच्या सँडलला चिखल लागल्याने तो साफ करण्यासाठी नदीच्या काठाजवळ त्या गेल्या आणि अचानक पाण्यात पडल्या. पावसामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या वाहून जायाला लागल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली.

जीवरक्षक टीमने तात्काळ धाव घेत महिलेची सुटका केली

आरडाओरडा ऐकून गरसे गावाचे पोलीस पाटील शशिकांत दिवाने यांनी जीवरक्षक टिमचे प्रदिप गायकर यांना तातडीने माहिती दिली. माहिती मिळताच गायकर यांनी कोणताही विलंब न करता भातसा नदी पात्राजवळ 10 मिनिटात घटनास्थळी बचाव उपकरणे, दोरी, जॅकेट घेऊन पोहचले. सुदैवाने नदिच्या पात्रातील खडकाचा आधार घेत महिला नदीच्या मध्यभागी प्रवाहात अडकली होती. यावेळी स्वतःच्या जीवची बाजी लावत जीवरक्षक टिमचे 5 सदस्य 500 मीटरहून अधिक अंतर पोहत गेले. वाहत्या पाण्यातून तिला बुडण्यापासून वाचवले असून या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. (A woman who fell into Bhatsa river in Kalyan was rescued by a lifeguard team)

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.