कौटुंबिक वाद झाला म्हणून नाशिकला गेला, पंधरा दिवसांनी थेट मृत्यूचीच बातमी आली, कारण ऐकून सर्वच हैराण !

कुटुंबाशी वाद झाला होता म्हणून तो नाशिकला जाऊन रहायला लागला. पण नाशिकमध्ये गेल्यानंतर पंधरा दिवसांनी जे घडलं त्याने कल्पनाही केली नसेल.

कौटुंबिक वाद झाला म्हणून नाशिकला गेला, पंधरा दिवसांनी थेट मृत्यूचीच बातमी आली, कारण ऐकून सर्वच हैराण !
राजकीय वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:42 AM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : नाशिकच्या जेलरोड परिसरातील श्री दुर्गामाता मंदिराजवळ रामेश्वरनगर येथे रविवारी मध्यरात्री हत्येची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मुंबई येथील एका व्यक्तीचा धारदार हत्याराने गळा चिरून, छातीवर आणि पोटावर भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांना आरोपी शोधण्याचे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. आरोपी हा मयत व्यक्तीचा मोबाईल आणि वाहन सोबत घेऊन पळून गेला होता. त्यामुळे ही हत्या कोणी आणि का केली, याविषयी गूढ निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले असून, या खूनामागे राजकीय वाद असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कौटुंबिक वादातून नाशिकला रहायला गेला होता तरुण

मूळचे मुंबईचे असलेले मयत प्रवीण दिवेकर हे कौटुंबिक वाद झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून एकटेच नाशिकमध्ये मुक्कामी होते. नाशिकच्या जेलरोड परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर प्रवीण मधुकर दिवेकर यांचा खून झाल्याची घटना घडली होती. मद्याच्या बाटलीच्या काचेने गळा चिरून हा खून करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात 2 तरुणासह अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजकीय वादातून हा खून झाला आहे.

राजकीय वादातून हत्या झाल्याचे निष्पन्न

‘राजकीय पद देतो’ असा दावा करून मयत प्रवीण दिवेकरने पक्ष प्रवेशासाठी 15 हजार रुपये मागितले. त्यानंतर वाद झाल्याने संशयितांनी रागातून दिवेकर यांच्या गळ्यावर वार केले. मयत प्रवीण दिवेकर आणि संशयित आरोपी हे सन 2012 पासून एका राजकीय संघटनेच्या माध्यमातून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. राजकीय वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 तरुणांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....