CCTV Video : ‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

CCTV Video : 'पाटलाच्या नादाला लागायचं नाही' म्हणत केला कोयत्याने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद
पाटलाच्या नादाला लागायचं नाही म्हणत केला कोयत्याने वारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 10:17 PM

बारामती : शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. पाटलाच्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत कोयत्याने वार केला. महेश उत्तमराव पैठणकर (46 रा.पैठणकर वस्ती शिवनगर माळेगाव बु.) असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा समावेश

माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश पैठणकर हा शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात 10 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उभा होता. यावेळी नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागण्याच्या कारणावरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर रा.शिवनगर माळेगाव याने महेशच्या डोक्यात आणि पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील यांच्यावर विविध कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी उपसरपंच सचिन तावरे पाटील याचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जखमी महेश पैठणकर यांच्यावर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत. (A young man was attacked with a scythe in a temple in Baramati)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.