Sindhudurg Girl Murder : तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीकडून घात? वेंगुर्ले मठच्या सायली गावडेची हत्येचा तपास या दिशेने

सायली गावडे ही कुडाळ येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होती. नेहमीप्रमाणे सायली शनिवारी सकाळी कामावर गेली होती. मात्र सायंकाळी ती घरी परतलीच नाही.

Sindhudurg Girl Murder : तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीकडून घात? वेंगुर्ले मठच्या सायली गावडेची हत्येचा तपास या दिशेने
तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीकडून घात?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 6:31 PM

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील मठ-कणकेवाडी येथे काजूच्या बागेमध्ये तरुणीचा मृतदेह (Girl Deadbody) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायली यशवंत गावडे (20) असे मयत तरुणीचे नाव आहे. आडेली वेतोरा हद्दीत काजूच्या बागेमध्ये आढळून आला. या युवतीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी युवतीच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासाह अन्य 3 संशयितांना पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात (Detained) घेतल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सर्व संशयितांची चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच हत्येचे कारण उलगडेल.

शनिवारी नेहमीप्रमाणे कामाला गेली मात्र घरी परतलीच नाही

सायली गावडे ही कुडाळ येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होती. नेहमीप्रमाणे सायली शनिवारी सकाळी कामावर गेली होती. मात्र सायंकाळी ती घरी परतलीच नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी सायली बेपत्ता असल्याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.

रविवारी काजूच्या बागेत आढळला मृतदेह

सायलीचा मृतदेह रविवारी रात्री 1 वाजता वेतोरे आडेली हद्दीतील एका बागेत आढळून आला. वेतोरेतील एका युवकाला हा मृतदेह निदर्शनास आला.

हे सुद्धा वाचा

डोक्यावर जखम, गळ्याभोवती काळा व्रण

सायलीच्या डोक्याच्या पाठीमागे जखम झाली आहे. तसेच तिच्या गळ्याभोवती काळा व्रण दिसून आला असल्याने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर रात्री तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

4 संशयित ताब्यात

सायली हिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार 4 संशयितांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. यात सायली हिच्या एकदम जवळच्या मैत्रिणीचा पतीचाही समावेश आहे.

या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्यासाह पोलीस पथक, ओरोस येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस पथक अधिक तपास करत आहेत. (A young woman was killed by stabbing her head in Sindhudurga)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.