पत्नीसोबत डान्स करण्यास रोखले, आरोपीने पतीचे डोकेच फोडले; पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

महामंदिर पोलीस ठाण्याअंतर्गत रातानाडा हरिजन वस्तीत 6 नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तीत राहणारा साहिल दारुच्या नशेत रोहनच्या पत्नीसोबत डान्स करु लागला.

पत्नीसोबत डान्स करण्यास रोखले, आरोपीने पतीचे डोकेच फोडले; पतीचा उपचारादरम्यान मृत्यू
Image Credit source: google
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 8:00 PM

जोधपूर : लग्नानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात पत्नीसोबत डान्स करण्यास रोखले म्हणून तरुणाने महिलेच्या पतीचे डोकेच फोडल्याची घटना राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडली आहे. जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला. रोहन असे मयत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. साहिल आणि विक्रम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विवाहानिमित्त संगीत समारंभाचे आयोजन केले होते

महामंदिर पोलीस ठाण्याअंतर्गत रातानाडा हरिजन वस्तीत 6 नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तीत राहणारा साहिल दारुच्या नशेत रोहनच्या पत्नीसोबत डान्स करु लागला. यादरम्यान तो अश्लील कृत्य आणि छेडछाडही करत होता.

डान्स करताना पत्नीशी गैरवर्तन केले म्हणून रोखले

डान्स करताना साहिलने गैरवर्तन केल्याने रोहन आणि अन्य लोकांनी त्याला रोखले. यानंतर साहिल आणि रोहन यांच्यात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की सुरु झाली. यानंतर रागाच्या भरात साहिल तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी साहिलने रोहनला भेटून रात्रीच्या कृत्याबद्दल माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांनंतर आरोपीने केला हल्ला

माफी मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशी साहिल काही लोकांना सोबत घेऊन रात्री चारण सभा भवनबाहेर गेला. यानंतर साहिलने पुन्हा रोहनशी भांडण सुरु केले. यादरम्यान साहिलने विक्रमवर लोखंडाच्या सळीने हल्ला केला. यात रोहन गंभीर जखमी झाला.

जखमी रोहनचा उपचारादरम्यान मृत्यू

रोहनच्या भावाने जखमी अवस्थेत त्याला एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली. यानंतर उपचारादरम्यान पहाटे रोहनचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.