AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माता न तू वैरिणी…आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड

आडगावमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Aadgaon Police arrest a mother and his lover

माता न तू वैरिणी...आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 5:28 PM

नाशिक: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच खून केला असल्याची धक्कादायक घटना आडगावमधील नांदूरनाका येथे उघडकीस आली आहे. आडगाव पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या घटनेतील सत्य समोर आले. पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकाराला बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. (Aadgaon Police arrest a mother and his lover for murder of her son)

याबाबत मिळालेली माहिती अशी, नाशिकच्या आडगाव परिसरातील एका महिलने तिच्या अनैतिक संबधात अडथळा ठरतो म्हणून पोटच्या पोराचा जीव घेतला असल्याचं उघडकीस आलं आहे. 6 वर्षाच्या मुलाचा तिच्या जन्मदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानं खून केला आहे.

6 वर्षाच्या चिरमुरड्याचा जन्मदात्या आईने आणि तिच्या प्रियकराने केला खून केला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. चिमुरड्याच डोकं भिंतीवर आपटून आईनेच त्याचा जीव घेतल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

अनैतिक संबंधासाठी आईनेच पोटच्या पोराचा जीव घेतल्याची मन हेलावणारी घटना आडगाव परिसरता घडली आहे. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिला आणि तिचा प्रियकर यांना अटक केली असून त्यांची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

मुलगा खेळताना पडल्याचा बनाव

मुलगा अंगणात खेळता खेळता पडला असा बनाव रचून आई आणि तिच्या प्रियकराने 22 डिसेंबरला मुलाला जिल्हा रुग्णलयात दाखल केलं आणि उपचार सुरू असतानाच या मुलाचा मृत्यू झाला, मात्र, नंतर डॉक्टरांनी आईची चौकशी केली असता आईने प्रियकरासोबत पळ काढला होता. त्यामुळे तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता आई आणि तिच्या प्रियकरानेच मुलाची हत्या केल्याच उघड झालं.आज या दोन ही संशयित आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आलं.

संबंधित बातम्या: 

प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पतीनंही मृत्यूला कवटाळलं!

3 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार? विव्हळत शेतात सापडली

(Aadgaon Police arrest a mother and his lover for murder of her son)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....