Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी हवेत गोळीबार, नंतर डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये थरार!

पनवेलच्या कामोठे येथे किरकोळ वादातून रंगलेला फिल्मीस्टाईल थरार पाहायला मिळाला. (Absconding Firing case accused nabbed within 24 hours by Kamothe police)

आधी हवेत गोळीबार, नंतर डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये थरार!
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 7:05 PM

पनवेल: पनवेलच्या कामोठे येथे किरकोळ वादातून रंगलेला फिल्मीस्टाईल थरार पाहायला मिळाला. दहा जणांच्या टोळक्याने दोन भावांशी हुज्जत घालून हवेत गोळीबार केला. त्यानंतर एकाच्या दिशेने गोळीही झाडली. मात्र, नेम चुकल्याने या आरोपींनी या दोन्ही भावांवर दगडांचा वर्षाव सुरू केला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना 24 तासांत ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत. (Absconding Firing case accused nabbed within 24 hours by Kamothe police)

मयूर बबन जाधव आणि त्याचा भाऊ योगेश बबन जाधव हे त्यांच्या मित्रांसोबत कामोठे येथील देशी ढाबा हॉटेल येथे मद्यप्राशन करत होते. त्याचवेळी या ठिकाणी त्यांच्या ओळखीचे मधुकुमार सुदन ऊर्फ मँडी हा आला. मँडीसोबत राकेश ठाकूर, मोहन गवडा, राकेश ठाकूर, विजय नाडर, अली, थापा, तेजस, अमय आणि नंदकिशोर हे सुद्धा होते. यावेळी या दहा जणांची मयूर आणि योगेशसोबत शाब्दिक चकमक उडाली. सर्वजण मद्यधुंद अवस्थेत असल्याने शब्दाला शब्द लागला आणि त्याची ठिगणी उडाली.

हा वाद अधिकच वाढल्याने मयूर आणि योगेश हे दोघेही हॉटेलच्या बाहेर पडले आणि घराकडे जायला निघाले. त्यामुळे या टोळक्याने या दोघांना जोरदार मारहाण केली. अली नावाच्या तरुणाने त्याच्याकडील पिस्तुल काढून आधी हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्याने योगेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी चुकवण्यात योगेश यशस्वी ठरला. त्यानंतर आरोपींनी या दोन्ही भावांच्या डोक्यात दगड घालून त्यांना मारहाण केली. त्यामुळे हे दोन्ही भाऊ रक्तबंबाळ झाल्याने घाबरलेल्या या आरोपींनी कार आणि मोटारसायकलवर बसून घटनास्थळाहून पलायन केलं.

कामोठे, नेरुळ, कोपरखैरणे, सानपाड्यात झाडाझडती

या घटनेनंतर मयूर आणि योगेशने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच कामोठे, नेरुळ, कोपरखैरणे आणि सानपाडा परिसरात झाडाझडती घेत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडील पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहे. इतर सहा जणांचा शोध घेण्यात येत असून आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल, असं पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी सांगितलं. (Absconding Firing case accused nabbed within 24 hours by Kamothe police)

संबंधित बातम्या:

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अ‍ॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्….

पुण्यातील ताडी विक्रेत्याचं गुजरातपर्यंत कनेक्शन, उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला

(Absconding Firing case accused nabbed within 24 hours by Kamothe police)

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.