Sangli Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरण, फरार निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अटक

जॉनवर सांगलीतील कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर सांगलीतील अपहरण आणि अत्याचार प्रकरणी पोलिसांनी त्याला मिरजमधून आज अटक केले.

Sangli Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरण, फरार निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अटक
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणी आरोपी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:37 PM

सांगली : एक कोटीची लाच मागणे आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन अत्याचार (Abused) प्रकरणातील फरार आरोपी निलंबित पोलीस कॉन्स्टेबलला सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. जॉन विलास तिवडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन्ही गुन्ह्यात जॉन तिवडेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जॉन फरार होता. जॉनवर सांगलीतील कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर सांगलीतील अपहरण आणि अत्याचार प्रकरणी पोलिसांनी त्याला मिरजमधून आज अटक केले.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार

जॉन तिवडे याने 2020 मध्ये नात्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीडिता आणि आरोपीचा शोध सुरु केला. घटनेनंतर दोन वर्षे पीडित मुलीचा पत्ताच लागत नव्हता. अखेर दोन वर्षांनी पोलिसांना पीडित मुलीचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता आरोपी जॉन तिवडेने आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले. त्यानुसार कुपवा पोलिसांनी जॉन तिवडे विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीने पुण्यातील देहूरोड येथील एका शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागितल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात तिवडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यात तिवडेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

खटल्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागितली

जॉन तिवडे याने देहूरोड येथील 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे पुणे येथील महसूल न्यायाधिकरणमध्ये दाखल खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तिवडे याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ उडाली होती. निलंबनाच्या कारवाईनंतर जॉन तिवडे फरार झाला. कुपवाड पोलीस आणि शाहुपुरी पोलीस तिवडेचा शोध घेत होते. जॉन सतत पोलिसांना चकवा देत होता. मात्र आज तो मिरजेत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सापळा रचून अखेर जॉनच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणी शाहुपुरी पोलीस पुढील कारवाई करतील. (Absconding suspended police constable arrested in case of kidnapping and abused of minor girl in sangli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.