एसीबीच्या कारवाईत पैसे खाण्याचा अनोखा पॅटर्न, एसीबीच्या तपासात जे समोर आलं ते ऐकून तुम्ही…
नाशिकच्या भूमी अभिलेख कार्यालयात निलेश कापसे या व्यक्तीला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
नाशिक : नाशिकच्या भूमी अभिलेख कार्यालयात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक ( ACB Acion ) विभागाने मोठी कारवाई केली आहे. खरंतर याच कार्यालयात महिनाभरापूर्वी नाशिकच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली होती. या दोन्ही कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या तपासात धक्कादायक ( Nashik Crime ) बाब समोर आली आहे. त्यानंतर मात्र भूमी अभिलेख कार्यालयात मोठं लाच घेणाचं रॅकेटच सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या भूमी अभिलेख कार्यालयात निलेश कापसे या व्यक्तीला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
नाशिकच्या भूमी अभिलेख विभागात महिनाभराच्या अंतरावर दुसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे.
महिनाभरापूर्वी याच कार्यालयात लाच घेतांना वर्ग एकच्या अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली होती. त्यामध्ये चुक् दुरुस्तीच्या प्रकरणातच लाच घेतांना दोन्ही अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या गळाला लागले होते.
असा आहे पैसे खाण्याचा प्लॅन
भूमी अभिलेख कार्यालयात अनेक मालमत्ताधारक आपले नाव रेकॉर्डला लावण्यासाठी जात असतात. त्यामध्ये अनेकांच्या मालमत्ताचे नकाशे ही चुकीचे असतात किंवा ते मुद्दामहून केले जातात. काही खरेदी विक्री अद्यावयात करण्यासाठी गेल्यानंतर चुक निदर्शनास येते. मात्र, बरेच वर्ष उलटले असल्याने त्यामध्ये अधिकारी काम करतांना चालढकल करतात. मग अनेक नागरिक अनेक दिवस कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. मात्र तरीही काम पूर्ण होत नाही आणि मग लाच घेऊन ते लागलीच पूर्ण करून देण्याचे प्रकार या कार्यालयात सर्रासपणे चालतात.