हायवे ओलांडणाऱ्या बाईकला भरधाव कारची धडक, दाम्पत्यासह लहान लेकराला उडवलं
औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा शिवारात दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी चालकासह एक महिला आणि लहान मुलगी जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटना स्थळावरून कारसह पळ काढला.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा शिवारात दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी चालकासह एक महिला आणि लहान मुलगी जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटना स्थळावरून कारसह पळ काढला. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकी टर्न घेत असताना हा अपघात घडला.
शेकटा शिवारात घडली घटना
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या शेकटा शिवार परिसरामध्ये एक दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्याकडेला जाण्यासाठी टर्न घेत होती. याचदरम्यान समोरून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तिघेही खाली पडले. मात्र चारचाकी चालकाने न थांबता तशीच गाडी वेगाने पुढे नेली.
सुदैवाने जीवितहानी टळली
या अपघातामध्ये तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या तिघांना धीर देत रुग्णालयात दाखल केले.
संबंधित बातम्या
Mumbai Drugs Case | उच्चभ्रू कुटुंबातील महिलाही ड्रग्ज व्यवसायात, झटपट पैशाच्या मोहाने सहभाग वाढता
औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 25 हजारांत एक लाखाचा धंदा! 6 लाखांचे खोटे चलन बाजारात?
“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद