कर्माचे फळ! अपघातग्रस्ताची बाइक चोरणाऱ्या तिघांचा अपघात, नेमके काय घडले?
Crime News: पहिल्या घटनेच्या 30 मिनिटानंतर दुसरी घटना घडली. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरु केला आहे. तिघांनी गाडीची चोरी केल्यानंतर मद्य प्राशन केले होते. तर विकासचा मृत्यू रस्त्यावर पडल्यामुळे झाला.
Crime News: सकाळी एक व्यक्ती कार्यालयात जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी रस्त्यावरुन आणखी तिघे जात होते. त्यांनी त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याची गाडी चोरुन नेण्याचे कृत्य केले. अपघातात गंभीर झालेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. परंतु त्यांची गाडीची चोरी करणारे तिघे काही अंतर पुढे गेले. त्यानंतर त्यांना शिक्षा मिळाली. त्या तिघांचा अपघात झाला. त्यातील एक जण गंभीर आहे. दिल्लीत घडलेली ही घटना आहे.
जखमी अवस्थेत सोडून गाडी घेऊन पळाले
दिल्लीत 11 जानेवारी रोजी मानवतेला कलंक लावणारी ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या विकास नावाच्या व्यक्तीला तिघांनी जखमी दुचाकीस्वारास रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर त्यांची गाडी चोरुन पळ काढला. विकास हे एका खासगी कंपनीत काम करतात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीवरुन पडल्यानंतर ते बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. त्यावेळी उदय कुमार, टिंकू आणि परमबीर हे तिघे त्या ठिकाणी आले. त्यांनी विकास यांना मदत करण्याऐवजी त्यांची गाडी घेऊन पळ काढला. हे तिघे फतेहपूर येथील रहिवाशी आहे. या अपघातात विकास यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीमधून उघड झाला प्रकार
गाडीची चोरी करणारे उदय कुमार, टिंकू आणि परमबीर हे तिघांचा पुढे मेहरोली-बदलूर रस्त्यावर अपघात झाला. तिघांना एम्सच्या ट्रॅमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील कुमार हा गंभीर आहे. तो कोमामध्ये आहे. तसेच टिंकू आणि परमबीर हे जखमी झाले आहेत. दक्षिण दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विकासला जखमी अवस्थेत सोडून या तिघांनी पळ काढल्याचे दिसत आहे.
30 मिनिटांत मिळाली शिक्षा
पोलिसांनी सांगितले की दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. पहिल्या घटनेच्या 30 मिनिटानंतर दुसरी घटना घडली. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरु केला आहे. तिघांनी गाडीची चोरी केल्यानंतर मद्य प्राशन केले होते. तर विकासचा मृत्यू रस्त्यावर पडल्यामुळे झाला. त्यांना वेळीच मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते.