AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हा लपवण्यासाठी त्याने सर्वकाही प्लाननुसार केलं, पण दातांनी केला घात आणि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही मागे सोडून जातो. त्यामुळे गुन्हेगाराला पकडणं पोलिसांना सोपं होतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात घडला आहे.

गुन्हा लपवण्यासाठी त्याने सर्वकाही प्लाननुसार केलं, पण दातांनी केला घात आणि पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलीस तपासात हतबल झाले होते, गुन्हेगार काही सापडेना अखेर दातांमुळे सर्वकाही झालं उघड
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 3:05 PM

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका कथित गुन्ह्यामुळे खळबळ उडाली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची कोणी हत्या केली असेल याबाबत कुजबूज सुरु होती. पोलीसही गुन्हेगाराचा शोध घेताना हतबल झाले होते. पण गुन्हेगार गुन्हा करताना काही ना काही पुरावा सोडून जातो हे देखील तितकंच सत्य आहे. त्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मागोवा घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दातांच्या व्रणावरून आरोपीचा शोध घेतला आणि गुन्ह्याची उकल झाली. मृत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलानेच हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पैशांच्या हव्यासापोटी वडिलांचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलीस तपासात काय आलं समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी राजूला दारु पिण्याचं व्यसन होतं. त्याच्या सवयीमुळे त्याला पैसे कोणीही पैसे देत नव्हतं. इतकंच काय तर हाती आलेले पैसे तो दारूत घालवायचा. त्याच्या रोजच्या सवयीमुळे घरचेही वैतागले होते. एक दिवस त्याने दुकान खोलण्यासाठी वडिलांकडे 10 लाख रुपये मागितले होते. मात्र वडिलांनी त्याला पैसे दिले नाही. त्या उलट बहिणीला 5 लाख रुपये दिले. मात्र त्याला न दिल्याने राग आला होता. अखेर त्याच रात्री दारु नशेत त्याने वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. राजूने दाताने वडिलांच्या छातीवर आणि कमरेवर चावा घेतला.तसेच त्यांची हत्या केली.”

गुन्ह्याची उकल कशी झाली

मृत महावीर सिंह यांचा मृतदेह शेतीजवळील टूबवेल जवळ आढळला होता. गावकऱ्यांनी हत्येचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. व्याजाचे पैसेन न दिल्याने शेजारील गावातील लोकांनी हत्या केली असावी अशी मोघम माहितीही दिली होती. पोलिसांनी सूत्र हलवतं तपासाला सुरुवात केली. मात्र गुन्हेगारापर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. अखेर पोलिसांनी शरीरावरील दातांचे व्रण तपासणीसाठी पाठवले. तपास करताना पोलिसांना घरच्यांवर संशय आला.

घरच्या व्यक्तींवर पोलिसांना संशय असल्याने प्रत्येकाच्या दाताच्या खुणा तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवल्या. अखेर फॉरेंसिक लॅबमधून आलेल्या रिपोर्टमध्ये दाताचे व्रण मुलाचे असल्याचे स्पष्ट झालं. मात्र तरीही तो गुन्हा कबुल करण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांचा खाक्या पाहून राजूने गुन्ह्याची कबुली दिली.

जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे.
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद.
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई.
पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती
पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती.
नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात 'वर्षा'वर बैठक, CM म्हणाले, मी सॅल्यूट...
नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात 'वर्षा'वर बैठक, CM म्हणाले, मी सॅल्यूट....