Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime | बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?

आपल्या बहिणीला पळवून नेण्याचे सतत मेसेज येत असल्यामुळे तणावात येऊन त्याने गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे. उत्तर प्रदेसमधील गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैथा या गावातील हा प्रकार आहे.

Crime | बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?
पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:30 AM

मुंबई : हत्या, आत्महत्येसारख्या अनेक घटना देशात रोजच घडतात. मात्र यामध्ये काही घटना ऐकून धक्का बसल्याशिवाय राहत नाही. सध्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या (Suicide) करण्यामागचं कारण हादरवून सोडणारं आहे. आपल्या बहिणीला पळवून नेण्याचे सतत मेसेज येत असल्यामुळे तणावात येऊन त्याने गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैथा या गावात हा प्रकार घडला. मृत तरुणाच्या गावातीलच काही तरुण त्याच्या बहिणीला पळवून नेण्याचे मेसेज सतत पाठवत असत. त्यासाठी मृत तरुणाला आरोपींनी एका ग्रुपमध्ये सामील केलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपींचा सोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं ?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार सैथा येथील आरोपी भुल्लन, बिट्टी आणि धुन्नू मृत कुशल दुबे यास सतत घाणेरडे मेसेज पाठवायचे. त्याच्या छोट्या बहिणीला पळवून नेण्याची ते सतत धमकी द्यायचे. सहा महिन्यांपूर्वी कुशलच्या मोठ्या बहिणीला गावातील एका तरुणाने पळवून नेले होते. मात्र कुशलच्या घरच्यांनी पोलिसांत धाव न घेता मुलीचे लग्न दुसरीकडे लावून दिले. याच कारणामुळे आरोपी भुल्लन, बिट्टी आणि धुन्नू कुशल यास सतत त्रास देत असत. तुझ्या छोट्या बहिणीलादेखील आम्ही पळवून घेऊन जाऊ, अशा प्रकारचे मेसेजेस हे आरोपी मृत तरुणाला पाठवत असत. तसा आरोप मृत कुशल याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु

याच सततच्या मेसेजेसमुळे तणावाखाली येऊन कुशलने गळफास लावत स्वत: आत्महत्या केली. मागील सहा महिन्यांपासून आरोपी कुशला सतत त्रास देत होते. या प्रकरणी अकबरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सविस्तर माहिती दिली आहे. गावात 18-20 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडलेली आहे. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचं कारण सांगण्यात आलं आहे. मृत तरुणाच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या :

धक्कादायक! तरुणाला जबर मारहाण, तोंडाने उचलायला लावले जमीनीवर पडलेले बिस्कीट, पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

धक्कादायक, जेवणाच्या सुट्टीत नराधमांनी डाव साधला, विद्यार्थीनीवर बलात्कार करून पळ काढला

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.