दोन हजाराच्या नोटा बदलण्याचे आमिष दाखवले, व्यापाऱ्याला लाखोंना गंडवले !

नोटा बदलण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्याचा आरोपीचा मनसुबा होता. यासाठी व्यापाऱ्याला नफा देण्याचेही आमिष दाखवले. मात्र आरोपींचा हा बनाव टिकू शकला नाही.

दोन हजाराच्या नोटा बदलण्याचे आमिष दाखवले, व्यापाऱ्याला लाखोंना गंडवले !
नोटा बदलीच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 12:54 PM

लातूर : दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवत एका व्यापाऱ्याला तब्बल 96 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रेणापूर तालुका कार्याध्यक्षासह आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी लातूरसह बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही अशा प्रकारची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

चार लाख रुपये नफा देण्याचे आमिष दाखवले

आरोपींनी धाराशिव जिल्ह्यातील कळंबचे व्यापारी अजिंक्य अभय देवडा यांना एक कोटीच्या नोटा बदलून पाहिजे असं सांगितलं. दोन हजार रुपयांच्या एक कोटी रकमेच्या नोटा बदलून 500 रुपयांच्या नोटा पाहिजे, असं सांगितलं. तसेच एक कोटीच्या बदल्यात 96 लाख द्या आणि उर्वरित 4 लाख रुपये तुम्हाला नफा म्हणून ठेवा, असे आमिष व्यापाऱ्याला दाखवले. व्यापारी यासाठी तयार होताच लातूरमध्ये ही डील करण्याचे ठरले.

500 नोटा घेतल्या पण 2000 च्या नोटा देण्यास टाळाटाळ

आमिषाला बळी पडून व्यापारी लातूरमध्ये 96 लाख रुपये घेऊन पोहचला. ठरल्या ठिकाणी आरोपी आणि फिर्यादी यांची भेट झाली. आरोपींनी व्यापाऱ्याकडून 96 लाख रुपये घेतले. मग एक कोटींच्या दोन हजाराच्या नोटा घेऊन आपला सहकारी येत आहे, अशी नाना कारणं सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करु लागले. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच व्यापाऱ्याने पोलिसांना फोन केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी रंगेहाथ आरोपींना पकडले

दरम्यान, आरोपी ही डील करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी आधीच तेथे सापळा लावला होता. यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या चार जिल्ह्यांतील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये लातूरच्या रेणापूरचा राष्ट्रवादीचा तालुका कार्याध्यक्ष किशोर माने याचाही समावेश आहे. लातूर शहरातील एमआयडीसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.