Adulterated tea : दूध, पनीर, खव्या पाठोपाठ आता बाजारात भेसळयुक्त चहा; मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं आवळल्या दोघांच्या मुसक्या
मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई : आपल्याकडे आजपर्यंत अनेक गोष्टीत भेसळ (Adulteration) होत असल्याचे उघड झाले आहे. पण मध्यंतरी दुधात भेसळ, पनीरमध्ये भसेळ, खव्यात भेसळ अशा अनेक प्रकारच्या भेसळीच्या बातम्या आपल्या वाचणात येत होत्या. आता मात्र चहा पिणाऱ्यांनो सावधान तुमचा चहा (tea) सुधा भेसळीचा असू शकतो. कारण आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ सुरू असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं (Crime Branch of Mumbai Police)मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील शिवडी बंदर रोडवर छापेमारी करत ही कारवाई केली. ज्यात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त करण्यात आली आहे. सध्या बाजारात या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत 85 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू अबुलजहर शेख, राहुल शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
Maharashtra | Mumbai Crime Branch arrested two people from Sewri area and seized 430 kgs of adulterated tea powder from their possession. Police investigation is underway to find out about the gang that indulged in this and where did they supply the powder to. pic.twitter.com/VntO7cov4j
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 16, 2022
दुध, पनीर, खव्या पाठोपाठ भेसळयुक्त चहा
अनेकांच्या बाबतीत चहा म्हटला की जीव की प्राण अशीच गत असते. त्यांना झोपेतून जरी उठवलं तरी ते चहा मागतील.तर अनेक जन असे आहेत ज्यांना जेवणानंतर लगेच चहा लागतो. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे उठल्यापासून झोपे पर्यंत चहा. मात्र आता या चहानेच अनेकांची झोप उडवलेली आहे. कारण मुंबईत तुम्ही पिणारा चहा हा कदाचित भेसळीचा असावा. कारण आजच्या बातमीमुळे तसाच प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. कारण असा विचार करायला लावणारी बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 85 हजार रुपये किंमतीची भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. त्यामुळे मुंबईत दुधात भेसळ, पनीरमध्ये भसेळ, खव्यात भेसळ याच्या पाठोपाठ आता चहा देखील भेसळीचा लोकांना प्यावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. यांच्याकडून कुणाकुणाला या भेसळयुक्त चहाचा पुरवठा होत होता, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
View this post on Instagram
तर आपण आवडीने पित असलेल्या या चहाच्या पावडरमध्ये देखील भेसळ झाली आहे. त्यामुळे आपण घरीच चहापावडर चांगली आहे की भेसळयुक्त हे ओळखू शकतो फक्त आपल्याला हे करायचं आहे. जे फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (Fssai) याबाबत जागृती करणारा एक व्हिडिओत सांगितलं आहे.
पाहूया ही चाचणी करायच्या पायऱ्या…
1. फिल्टर पेपर घ्यायचा, त्यावर चहा पावडर घ्यायची
2. पाण्याचे काही थेंब या पावडरवर कागद भिजेपर्यंत घालायचे
3. हा पेपर नळाखाली धुवायचा
4. या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास त्या पावडरीत भेसळ आहे हे सिद्ध होते. जर पेपरला डाग पडला नाही किंवा अगदी हलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही असे समजायचे.