Pune News : जेलमधून सुटल्यानंतर गणेश कसबेची पुण्यात जंगी मिरवणूक, आता त्याचा हा VIDEO बघा

Pune News : मोक्कातील आरोपी गणेश कसबेने येरवडा जेलमधून सुटल्यानंतर पुण्यात रॅली काढली होती. आता पुणे पोलिसांनी या आरोपीला चांगलाच दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना त्यांनी थेट मोठ पाऊल उचललं.

Pune News : जेलमधून सुटल्यानंतर गणेश कसबेची पुण्यात जंगी मिरवणूक, आता त्याचा हा VIDEO बघा
Ganesh Kasbe
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 7:59 AM

पुण्यात सध्या गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. गुंडांवर पोलिसांची दहशत राहिलेली नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्याचं नुकतच एक उदहारण समोर आलं होतं. मोक्कातील आरोपीने येरवडा जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढली होती. मोक्कातील आरोपी गणेश कसबेने समर्थकांसह पुण्यात रॅली काढली होती. या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. मोक्का असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनाधास्तपणे रॅली काढण्याची हिम्मतच कशी होते? अशी टीका पुणे पोलिसांवर सुरु झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी या टीकेला कृतीमधून उत्तर दिलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. ज्या रस्त्याने गणेश कसबेने रॅली काढली. त्याचं रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. गुन्हेगारांवर दहशत बसावी व सर्वसामान्यांमध्ये भिती राहू नये यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललं.

रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका

या प्रकरणी मोक्कातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली. येरवडा पोलिसांनी रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका दिला. पुणे पोलिसांनी आरोपींची धिंड काढण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींची धिंड काढली आहे. पण पुणे शहरात गुन्हेगारी कमी झालेली नाही. वाहनांची तोडफोड, लुटमार, हत्या असे प्रकार सुरुच आहेत.

‘गुन्हेगारी वाढली, असे म्हणता येणार नाही’.

“पुण्यात काही गोष्टी घडत आहेत, हे खरे आहे. मात्र, त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे, असे म्हणणे योग्य नाही. शहरात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष असून यापूर्वीच्या घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गुन्हे वाढू नयेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढविण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुरंदर विमानतळ, जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प, कोल्हापूर महामार्गाबाबतही त्यांनी भाष्य केले. त्यावेळी पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे का, असे विचारले असता त्यांनी गुन्हेगारी वाढले असे म्हणणे योग्य नाही, असे स्पष्ट केले.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.