प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं! बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना?

प्रेयसीला भेटायला जाण्यासाठी जर तुम्ही बुरखा घालून जात असाल तर सावधान! तुम्ही मुलं चोरणारे आहात असा संशय लोकांना आला तर...?

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं! बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना?
साताऱ्यात तरुणाला मारहाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 2:33 PM

संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा : नाशिकच्या आशिकनंतर आता सातारच्या मजनूला लोकांनी चोप दिलाय. बुरखा घालून आल्यामुळे जशी घटना नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडली होती. अगदी तशीच घटना आता साताऱ्यातही (Satara Crime News) घडलीय. मुलं चोरणारी व्यक्ती आहे, असं समजून लोकांनी बुरख्यात आलेल्या युवकाला बेदम मारहाण (Youth beaten) केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेचा व्हिडीओही मारहाण करणाऱ्यांनी रेकॉर्ड केला.

साताऱ्यातील करंजे येथील तामजाई नगरमध्ये एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो एका शाळेचं नाव विचारत होता. त्यावेळी तिथे असलेल्या एका दुकानदाराला संशय आला. त्याने या युवकाला पकडलं. बुरख्यात स्त्री नाही, तर पुरुष असल्याचं लक्षात येताच लोकं संतापली. लोकांना वाटलं हा चोरच आहे.

बुरखा घालून स्त्रीच्या वेशात मुलं चोरायला पुरुष आल्याचा संशय लोकांना आला. याच संशयातून जमलेल्या लोकांनी बुरख्यात असलेल्या युवकाला चोप चोप चोपलं. त्यानंतर त्याला शाहुपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या युवकाची लोकांच्या तावडीतून सुटका केली आणि त्याला अखेर पोलीस स्टेशनमध्ये आणलं.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या युवकाची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर युवक नीट उत्तर देत नाही म्हणून अखेर त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर युवकाने आपण प्रेयसीला भेटण्यासाठी आल्याचं कबुल केलंय.

पाहा लाईव्ह घडामोडी :

धक्कादायक बाब म्हणजे हा युवक आणि त्याची प्रेयसी दोघंही विवाहीत असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. पण प्रेयसीला भेटण्यासाठी वेश बदलून येणं अखेर तरुणाला महागात पडलं.

मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियात गेल्या काही दिवसांत पसरल्या होत्या. मात्र अशी कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचं अनेकदा पोलिसांकडूनही स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी मुलं चोरी करणारे आहे, असं समजून मारहाण होण्याच्या घटना सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय.

याआधी नाशिकमध्येही प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून जाणं एका तरुणाला अंगलट आलं होतं. या तरुणालाही नाशिकमधील लोकांनी जबर मारहाण केली होती. नाशिकसोबत जळगाव, सांगली, रत्नागिरी आणि आता साताऱ्यातही मारहाणीच्या या घटना समोर आल्या आहेत.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.