सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये चिंतेच वातावरण आहे. बॉलिवूड सुपर स्टार सलमान खानला धमक्या मिळत आहेत. तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. आता बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी
salman khan
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 2:06 PM

बॉलिवूड सुपर स्टार सलमान खान आधीच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मात्र, तरीही अलीकडे सलमान खानला बऱ्याच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानला सुद्धा धमकी मिळाली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनवरुन शाहरुखला ही धमकी मिळाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शाहरुखच्या धमकी प्रकरणात छत्तीसगड रायपूर कनेक्शन आढळून आलं आहे. तिथे राहणाऱ्या फैझान नावाच्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला होता. मुंबई पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी रायपूरला गेली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहरुख खानच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

…म्हणूनच चाहत्यांना भेटला नाही

पठाण आणि जवानच्या यशानंतर धमक्या मिळाल्याच मागच्यावर्षी शाहरुखने म्हटलं होतं. ऑक्टोंबर 2023 मध्ये शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणामुळेच शाहरुख खान यावर्षी त्याच्या बर्थ डे ला मन्नत बंगल्याबाहेर जमलेल्या त्याच्या चाहत्यांना भेटला नव्हता, असा दावा करण्यात येतोय.

सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक

सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काही दिवसांपूर्वी मिळाला होता.  याप्रकरणी अपडेट समोर आली आहे. सलमानला धमकी देणाऱ्या एका तरूणाला अखेर बुधवारी अटक करण्यात आली आहे. विक्रम असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. पोलिसांनी कर्नाटकमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.