आधी अंगावर थुंकले, मग सॉरी बोलण्याच्या बहाण्याने असे उडवले 3.50 लाख रुपये

नेमकी ही चोरी कशी केली?. तिथे येताच बाइकवर बसलेल्या दोन आरोपींपैकी एक जण त्यांच्या अंगावर थुंकला. समस्तीपुरमधील गोला रोडवर ही घटना घडली.

आधी अंगावर थुंकले, मग सॉरी बोलण्याच्या बहाण्याने असे उडवले 3.50 लाख रुपये
Loot Crime
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 4:07 PM

पाटणा : बँकेतून पैसे काढून घरी निघालेल्या एका वृद्ध माणसाला चोरांनी मोठ्या चालाकीने 3.50 लाख रुपयांना लुटलं. दिवसाढवळ्या झालेल्या लुटमारीच्या या घटनेने सगळेच हैराण आहेत. पीडित वुद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केलाय. सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा घडलाय. जितवारपुर निजामत येथे राहणारे चंद्रशेखर राय जुन्या पोस्ट ऑफिस रोडवर असलेल्या सेंट्रल बैंक ऑफ इंडियात गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी बँकेतून 3.50 लाख रुपये काढले. पैसे काढून सायकलवरुन ते घरी परतत होते. चंद्रशेखर गोला रोडवर आले. बिहारच्या समस्तीपुरमधील गोला रोडवर ही घटना घडली.

तिथे येताच बाइकवर बसलेल्या दोन आरोपींपैकी एक जण त्यांच्या अंगावर थुंकला. बाइकस्वाराने दुचाकी थांबवली व त्यांच्याजवळ जाऊन सॉरी बोलला. तुमचे कपडे धुवून देतो असं त्याने सांगितलं. युवकांना आपल्या चुकीची जाणीव झालीय. म्हणून ते सॉरी बोलतायत, असा चंद्रशेखर राय यांचा समज झाला. कपडे धुण्याच्या बहाण्याने ते चंद्रशेखर यांना हँडपंपच्या जवळ घेऊन गेले. चंद्रशेखर यांनी सायकल तिथेच थांबवली. पैशाचा गठ्ठा असलेली पिशवी हँडपंप जवळ ठेवून ते थुंकी साफ करत होते. या दरम्यान दुसरा युवक पैशाची पिशवी घेऊन पसार झाला. पोलीस काय म्हणाले?

नगर ठाण्याचे पोलीस प्रमुख विक्रम आचार्या यांनी सांगितलं की, “वृद्ध व्यक्तीच्या अंगावर थुंकून फसवणुकीच हे प्रकरण समोर आलय” पीडित व्यक्तीने तक्रार दिलीय. पोलीस चौकशी करत आहेत. घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेतायत. आरोपींना लवकरच पकडू असं पोलिसांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.