Mumbai Crime : आईच्या हत्येनंतर मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण अस्पष्ट

मुलुंडच्या वर्धमाननगर मध्ये सी विंग या इमारतीत राहणाऱ्या पांचाळ कुटुंबीय अत्यंत शांतता प्रिय असून अनेक राहत होते . मात्र ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.

Mumbai Crime : आईच्या हत्येनंतर मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण अस्पष्ट
आईच्या हत्येनंतर मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्नImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:44 PM

मुंबई मुंबईच्या (Mumbai) मुलुंड (Mulund) परिसरामध्ये वर्धमान नगर येथे एका तरुणाने आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर स्वतः रेल्वे समोर उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नेमका वाद कशामुळे झाला याचा अद्याप खुलासा झालेला नाही. आत्महत्या कऱण्यासाठी गेलेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचे वडील त्याच्यासोबत रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली आहे. जयेश पांचाळ असं त्यांच्या मुलाचं नाव असून छाया महेश पांचाळ असं त्याच्या आईचं नाव आहे. हा वाद मालमत्तेवरुन झाला असावा असा पोलिसांना अंदाज आहे. आईची हत्या केल्यानंतर मुलाने रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना (Mumbai Police) मिळाली आहे. हे कुटुंब मुलुंडमध्ये अनेक वर्षांपासून राहायला आहे.

मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलुंडच्या वर्धमाननगर मध्ये सी विंग या इमारतीत राहणाऱ्या पांचाळ कुटुंबीय अत्यंत शांतता प्रिय असून अनेक राहत होते . मात्र ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. जयेश पांचाळ नावाच्या 22 वर्षीय मुलाने आपल्याच आईची हत्या केली. त्यानंतर त्याने ट्रेनसमोर उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आईचा मृत्यू झालाअसून मुलगा सध्या रुग्णालयात भर्ती आहे. मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतर वडील त्याच्या सोबत आहेत. त्याची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

मालमत्तेवरून वाद झाला असावा अशी पोलिसांना शंका

मात्र या घटनेमागे नेमकं कारण काय हे अजून समोर आलेलं नाही. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण प्रॉपर्टीच्या वादातून उद्भवलेलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र घटना स्थळावरून पोलिसांना गुजरातीमध्ये लिहिलेला एक लिखित पुरावा मिळाला आहे. जेणेकरून मुलानेच आपल्या आई छाया महेश पांचाळ ( 46 ) यांची हत्या केली आहे. असं दिसून येत आहे . मुलुंड पोलिसांनी या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पुढील तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

आपल्या आईची हत्या केल्याची कबुली

मुलुंडमध्ये एक २२ वर्षीय तरुणाने स्वतः च्या आईची हत्या करून लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंड मध्ये घडली आहे.छाया महेश पांचाळ असे ४६ वर्षीय मयत महिलेचे नाव असून तिची हत्या तिचाच २२ वर्षीय मुलगा जय याने केली आहे. मुलुंड च्या वर्धमान नगर मध्ये पांचाळ कुटुंबीय रहातात काल संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांचा घरातून रक्त येत असल्याचा कॉल प्राप्त झाला.या वेळी मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृत पडलेल्या आढळल्या.या वेळी पोलिसांना एक गुजराती भाषेत चिट्ठी देखील आढळली.जी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती. यात त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.