कशाला हवीत अशी मुलं?… स्वत:चं डोळ्याचं हॉस्पिटल, फॅक्ट्री, कोट्यवधीची संपत्ती, चार मुलं; तरीही तिच्या नशिबी वृद्धाश्रम

स्वत:चं डोळ्याचं हॉस्पिटल, मोठमोठे वाडे, गाड्या, बंगले, प्रचंड बॅंक बॅलन्स आणि चार मुलं असतानाही एका महिलेला वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. मुलंच सांभाळत नसल्याने वृद्धापकाळात या महिलेवर ही वेळ ओढवली आहे.

कशाला हवीत अशी मुलं?... स्वत:चं डोळ्याचं हॉस्पिटल, फॅक्ट्री, कोट्यवधीची संपत्ती, चार मुलं; तरीही तिच्या नशिबी वृद्धाश्रम
vidya deviImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:31 AM

आग्रा : जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं घरात राज्य असतं. तुमचा पती जिवंत असेपर्यंत सर्वच तुमचं ऐकत असतात. पण नवरा गेला अन् वृद्धापकाळ आला तर जगणं असह्य होतं. जे उठता बसता सलाम करायचे तेही लोक नंतर दादागिरी करू लगातात. कधी कधी तर पोटचे गोळ्यांनाही आपण जड होतो. देशातील अब्जाधीशांचं घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका 87 वर्षीय महिलेच्या वाट्याला काहीसं असंच उदासवाणं जीवन आलं आहे. चार मुलं आहेत. कोट्यवधीची संपत्ती आहे. पण या महिलेला सांभाळायला कोणीच नाही. सध्या ही महिला वृद्धाश्रमात राहत आहेत. मुलांच्या राज्यात सुख भोगण्याच्या काळात या महिलेला वृद्धाश्रमात राहून मृत्यूची वाट पाहावी लागत आहे.

विद्या देवी असं या महिलंच नाव आहे. आग्र्यातील प्रसिद्ध डोळ्याच्या हॉस्पिटलचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांची त्या पत्नी आहेत. गोपीचंद अग्रवाल हे शहरातील प्रसिद्ध अब्जाधीश होते. त्याकाळी विद्या देवी आपल्या अलिशान महालामध्ये चार मुलांसोबत राहायची. चारही मुलांना वाढवलं. त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं. आपल्या पायावर उभं केलं. त्यांचे लग्नही लावून दिले. 13 वर्षापूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं आणि विद्या देवींचं नशीबच फिरलं. त्यांच्या आयुष्याला हळूहळू कलाटणी मिळाली. मुलांनी संपत्तीची विभागनी केली. आपआपला हिस्सा घेतला. मात्र, आईला काहीच दिलं नाही. अग्रवाल कुटुंबाची टॅक्टर्सचे पार्ट बनवण्याची फॅक्ट्री आहे. बंगले आहेत. प्रचंड पैसाही आहे. पण विद्या देवीला सांभाळणारं कोणी नाहीये.

हे सुद्धा वाचा

धक्के मारून हाकलून दिलं

काही दिवस विद्या देवी आपल्या मोठ्या मुलासोबत राहिली. मात्र, मोठ्या सूनेने उठता बसता टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यादेवी दुसऱ्या मुलाकडे राहायला गेली. त्यानंतर तिसऱ्या आणि मग चौथ्या मुलाकडे राहायला गेली. चारही मुलांकडे तोच अनुभव आला. सूनांकडून छळ होत होता. एक सून म्हणाली, तुमच्या कपड्यांचा वास येतोय… तर एकीने यमूना नदीत फेंकण्याची धमकी दिली. मात्र, विद्या देवीने तरीही घर सोडण्यास नकार दिला. तर मुलाने तिला मारहाण केली आणि धक्के मारत घराबाहेर काढलं.

मुलं ऐकली नाहीत

याबाबत विद्या देवींची नातेवाईक अग्रवाल महिला मंचची अध्यक्ष शशी गोयल यांनी विद्या देवीच्या सर्व मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलं ऐकली नाहीत. त्यामुळे शशी गोयल यांनी विद्या देवींना 19 डिसेंबर रोजी रामलाल वृद्धाश्रमात ठेवलं. सध्या विद्या देवी या वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यांची आश्रमाद्वारे काळजी घेतली जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.