AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कोठडीतील आरोपीचा कंटनेरखाली चिरडून मृत्यू, अपघात की घातपात? नातेवाईकांचा सवाल

राहता शहरातील जनार्दन बंडीवार याला दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. सुरुवातीला ताडी विक्री करणाऱ्या जनार्दनचा व्यवसाय बंद असताना अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

पोलीस कोठडीतील आरोपीचा कंटनेरखाली चिरडून मृत्यू, अपघात की घातपात? नातेवाईकांचा सवाल
शिर्डीमध्ये एक्साईज विभागाच्या ताब्यातील आरोपीचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 9:03 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक्साईजच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झालाय. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पोलीस कोठडीत असताना आरोपी पळालाच कसा? त्याचा मृत्यू अपघातात झालाय की काही घातपात आहे? असा सवाल आरोपींच्या नातेवाईकांनी केलाय. राहता शहरातील जनार्दन बंडीवार याला दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. सुरुवातीला ताडी विक्री करणाऱ्या जनार्दनचा व्यवसाय बंद असताना अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. (Accused in police custody crushed to death under container)

दोन दिवसापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत असलेल्या जनार्दनचा आज बाभळेश्वर गावातील चौकात कंटेनर खाली मृत्यू झालाय.. हा मृत्यू नेमका कसा झाला? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. जर जनार्दन पोलीस कोठडीत होता तर त्याचा अपघात झालाच कसा? असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी उपस्थित केला आहे. केवळ पैसे मिळवण्यासाठी एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी जनार्दनचा बळी दिल्याचा आरोप आता केला जातोय.

सदर घटनेचा तपास आता लोणी पोलीस स्टेशन करत आहे. एक्साईजच्या कस्टडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू कसा झाला? त्याच्या मृत्यूचे कारण काय आहे? हे चौकशी नंतर स्पष्ट होणार असल्याचं डिवायएसपी संजय सातव यांनी म्हटलंय. जनार्दन बंडीवार या तरूणाचा व्यवसाय बंद असताना केवळ पैसे मिळवण्यासाठी या तरूणावर अत्याच्यार केले गेलेय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इतर बातम्या :

फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर हातात हत्यारं असलेले फोटो, पुण्यात 19 जणांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

गोळीबाराच्या आरोपातून राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाची मुक्तता, लोकांनी घातली दुधाने अंघोळ

Accused in police custody crushed to death under container

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.