अहमदनगर : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत व्यवसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. यावेळी त्याचा अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर थेट एक कोटींची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर संबंधित व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच पीडित व्यवसायिकास मारहाणही करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित व्यवसायिकाचे दागिनेही हिसकावल्याची घटना समोर आली आहे (Ahmadnagar Police arrest Lady who black mailing big businessman through honey trap).
महिलेसह तिच्या साथीदारास अटक
अहमदनगरला पुन्हा एकदा हनी ट्रॅपवचा प्रकार समोर आलाय. श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आलाय. विशेष म्हणजे त्या व्यवसायिकास तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात अली होती. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केल आहे. अमोल सुरेश मोरे असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे (Ahmadnagar Police arrest Lady who black mailing big businessman through honey trap).
आरोपींनी जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल हिसकावला
आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराने पीडित व्यवसायिकाला मारहाण करून त्याच्याकडील 5 तोळे वजनाची सोन्याची चेन, चार अंगठ्या आणि रोख रक्कम 84 हजार रुपये हिसकावून घेतला आहे. महिला आणि तिच्या साथीदाराने आतापर्यंत एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या प्रकरणी तालुका पोलीस पुढील तपास करत आहे.
नालासोपाऱ्यातही हनी ट्रॅपची घटना समोर
याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वा नालासोपाऱ्यातही हनी ट्रॅपची घटना समोर आली होती. त्यावेळी मुंबईजवळच्या नालासोपारा भागतील तरुणाला दिल्लीच्या तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले आणि पैशांची मागणी केली होती. आरोपी तरुणीने व्हॉट्सअॅपवर अश्लिल चॅटिंग, मग व्हिडीओ कॉलिंग आणि नग्न अंगप्रदर्शन केले. तसेच तरुणालाही ऑनलाईन अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडीओ सेव्ह केले. त्यानंतर तरुणाचे अश्लील व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी तरुणीने 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तरुणाच्या तक्रारीवरुन दिल्लीच्या युवतीवर तुळींज पोलीस ठाण्यात आयटी कायद्यासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार यासर्वांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याची अनेक उदाहरण सापडतील. सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरुन या दरम्यान ब्लॅकमेलिंग केलं जातं.
राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो.
संबंधित बातम्या :
भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…
आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा