Ahmedabad Murder: गुजरातमध्ये ‘मराठी’ कुटुंबाच्या हत्याकांडानं अहमदाबाद हादरलं, 4 दिवसांपासून मृतदेह सडले, कुटुंबातला वाद की आणखी काही?

स्थानिकांनी मग सरळ पोलीसांना फोन करुन माहिती दिली. पोलीसांनीही मग वेळ न लावता दिव्यप्रभा सोसायटी गाठली. घराचं कुलूप तोडलं. काही प्रत्यक्षदर्शी सोबत ठेवले. घराचं दार उघडताच आतून दुर्गंधीचा लोट बाहेर आला. मस्तकापर्यंत तो झोंबेल अशी स्थिती होती. पोलीसांनी तसेही आधीच मास्क, रुमाल नाकाला लावलेलेच होते. काही तरी भयंकर घरात घडल्याचा अंदाज पोलीसांना आलाच.

Ahmedabad Murder: गुजरातमध्ये 'मराठी' कुटुंबाच्या हत्याकांडानं अहमदाबाद हादरलं, 4 दिवसांपासून मृतदेह सडले, कुटुंबातला वाद की आणखी काही?
अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांची हत्या, संशयीत आरोपी फरारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 5:54 AM

गुजरातची (Gujrat ) राजधानी अहमदाबाद (Ahmedabad Murder) एका हत्याकांडानं हादरुन गेलीय. विशेष म्हणजे चार दिवसानंतर हे हत्याकांड उघड झालंय. एकाच कुटुंबातल्या चार जणांची हत्या करण्यात आलीय (4 people murder) आणि चारही जणांचे मृतदेह हे वेगवेगळ्या रुममध्ये सापडलेत. घरात झालेल्या वादातूनच हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक संशय पोलीसांनी व्यक्त केलाय. त्याच आधारावर विनोद मराठी नावाच्या संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेतायत. हत्याकांडाचं नेमकं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. संशयीत आरोपी पोलीसांच्या हाताला लागला तर आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

घटना नेमकी कशी घडलीय? अहमदाबादमध्ये ओढव नावाचा भाग आहे. याच भागात दिव्य प्रभा नावाची सोसायटी आहे. ह्या सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंध यायला लागला. स्थानिकांना काही तरी काळंबेरं आल्याचा संशय आला. ज्या घरातून दुर्गंध येत होता, त्या घरात रहिवाशांनी, सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. पण घरासमोर एकदम सन्नाटा होता. स्थानिकांनी मग सरळ पोलीसांना फोन करुन माहिती दिली. पोलीसांनीही मग वेळ न लावता दिव्यप्रभा सोसायटी गाठली. घराचं कुलूप तोडलं. काही प्रत्यक्षदर्शी सोबत ठेवले. घराचं दार उघडताच आतून दुर्गंधीचा लोट बाहेर आला. मस्तकापर्यंत तो झोंबेल अशी स्थिती होती. पोलीसांनी तसेही आधीच मास्क, रुमाल नाकाला लावलेलेच होते. काही तरी भयंकर घरात घडल्याचा अंदाज पोलीसांना आलाच. त्यातल्या काहींसाठी हा अनुभव नवा नव्हता. घर मोठं होतं. तीन चार दिवसापासून ते उघडलं गेलं नसावं हे आतल्या परिस्थितीवरुन लक्षात येत होतं. पोलीसांनी संपूर्ण घराची तपासणी केली तर त्यांच्या जे डोळ्याला दिसलं त्यानं हादरलेच. घरातल्या वेगवेगळ्या खोलीत एक नाही, दोन नाही तर चार मृतदेह चित्रविचित्र अवस्थेत पडले होते. बहुतांश मृतदेह सडलेही होते. त्यातूनच नाकाला झोंबणारा वास सुटलेला होता.

कोण आहेत ‘मराठी’ पीडित? पोलीसांनी शोधाशोध घेतल्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक ‘मराठी’ कुटुंब आहे. म्हणजेच कुटूंब मराठी आहे की त्यांचं आडनाव मराठी आहे याची अजून सविस्तर माहिती नाही. पण कुटुंबातल्या वादातूनच विनोद मराठी ह्या संशयीत आरोपीनंच स्वत:च्या कुटुंबाचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती आहे. विनोद मराठीनेच पत्नी सोनल मराठी, मुलगी प्रगती, मुलगा गणेश आणि सासू सुभद्राबाई यांचा खून केल्याचा संशय आहे. पण सध्या तरी विनोद मराठी हा फरार आहे. हे हत्याकांड चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले गेलेत.

हे सुद्धा वाचा:

पालघरमधील हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या

Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.