Ahmednagar Crime : पत्नीला फिरायला घेऊन गेला आणि घात केला, पर्समधील ‘त्या’ वस्तू ठरल्या तपासातील महत्वाचा दुवा

पतीने भाच्याच्या मदतीने पत्नीचा काटा काढला. यानंतर मृतदेह अज्ञात स्थळी फेकून दोघे पसार झाले. पण एका वस्तूने आरोपींचे बिंग फोडले.

Ahmednagar Crime : पत्नीला फिरायला घेऊन गेला आणि घात केला, पर्समधील 'त्या' वस्तू ठरल्या तपासातील महत्वाचा दुवा
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 2:20 PM

अहमदनगर / 10 ऑगस्ट 2023 : चारित्र्याच्या संशयातून पतीने भाच्याच्या मदतीने पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि भाच्याला अटक केली आहे. कल्याणी महेश जाधव असे मयत महिलेचे नाव आहे. राजूर पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र मृतदेहाजवळ महिलेची पर्स आढळली. या पर्सची तपासणी केली असता पोलिसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. या सॅनिटरी पॅडनेच हत्याकांडाचा उलगडा करत आरोपींचा पर्दाफाश केला. महेश जाधव आणि मयूर साळवे अशी अटक आरोपींची नावे आहेत. हत्येची घटना उघड होताच राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

चारित्र्याच्या संशयातून हत्येचा कट

राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात कल्याणी जाधव आणि महेश जाधव हे जोडपे आपल्या दोन मुलींसह राहत होते. महेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने भाच्याच्या मदतीने पत्नीचा काटा काढण्याचा कट रचला. प्लाननुसार महेश जाधव, कल्याणी जाधव आणि मयूर साळवे तिघे 3 ऑगस्ट रोजी भंडारदरा येथे फिरायला गेले. तेथे महेश आणि मयूरने कल्याणीची हत्या केली. मग मृतदेह अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात फेकून दोघे पसार झाले.

अकोले तालुक्यात पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत पुढील तपास सुरु केला. महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांना मृतदेहाजवळ महिलेची पर्स सापडली. पोलिसांनी पर्स तपासली असता आत पैंजण आणि सॅनिटरी पॅड सापडले. याच सॅनिटरी पॅडच्या मदतीने पोलिसांनी महिलेची ओळख पटवली.

हे सुद्धा वाचा

‘असे’ उलगडले हत्येचे रहस्य

महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सँनिटरी पॅडवर ‘फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद, अहमदनगर असं लिहलेलं होतं. हे पॅड जिल्ह्यातच ग्रामीण भागातील महिलांसाठी जिल्हा परिषदेकडून वाटले जातात. पोलिसांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संपर्क केला. अंगणवाडी ताई आणि आशा सेविका यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मयत महिलेचा फोटो आणि मॅसेज व्हायरल केला. हा फोटो पाहून वांबोरी येथून एक फोन एलसीबी अधिकाऱ्यांना गेला आणि महिलेची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी पतीची चौकशी करत हत्याकांडाचा उलगडा केला. पोलिसांनी पतीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.