जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?

प्रेम प्रकरणातून धमकावण्याच्या प्रकरणात बाळा बोठे निर्दोष सुटला, आणि त्याच्या प्रगतीचा आलेख सरळ वरच्या दिशेनं राहिला.

जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 1:41 PM

अहमदनगर : पत्रकार, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राचा वृत्तसंपादक ते सुपारी किंग आणि आता बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी… नाव- बाळा बोठे… अहमदनगर जिल्ह्यातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या रेखा जरे हत्याकांडात सुपारी दिल्याचा आरोप बाळा बोठेवर आहे, पण अद्यापही बाळा बोठे फरार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरेंची नगर-पुणे रोडवरील जातेगावच्या घाटात हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सुपारी बाळा बाठेनेच दिल्याचं आता पोलीस तपासात उघड झालं आहे. पण हा बाळा बोठे कोण? ज्या जातेगावच्या घाटात त्याने हे क्रूर कृत्य केल्याचा आरोप आहे, त्या जातेगावच्या घाटाशी त्याचा आधीपासून काय संबंध होता? हीच कहाणी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. (Ahmednagar Rekha Jare Murder case Who is Bala Bothe)

कॅमेरा गेला लेखणी आली

अहमदनगरपासून अवघ्या 17 किलोमीटरवर असणाऱ्या वाळकी इथे बाळा बोठे लहानाचा मोठा झाला. कॉलेज शिक्षणानंतर त्याला फोटोग्राफीचा छंद जडला आणि तो फोटोग्राफी करु लागला. काही फोटो वर्तमानपत्रातही येऊ लागले. त्यातच अहमदनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांच्याशी त्याची ओळख झाली. बाळा बोठेतील धडपडेपणा पाहून मिरीकरांनी त्याला पत्रकारितेत आणलं आणि कॅमेरा जाऊन लेखणी हाती आली.

…आणि बाळा बोठे हिरो झाला

शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन बाळा बोठे करु लागला. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे आरोप

याच प्रकरणानंतर बाळा बोठेने जीविताला धोका असल्याचं सांगितलं. आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली. बोठेसोबत 24 तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली. शहरातील लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत बोठेची तगडी ओळख झाली. त्यातच एका तरुणीनं बाळा बोठेवर एकतर्फी प्रेम प्रकरणातून धमकावण्याचे आरोप केले आणि बोठेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हेही प्रकरण शहरात चांगलंच गाजलं, मात्र या प्रकरणात बाळा बोठे निर्दोष सुटला. त्यानंतर बाळा बोठेच्या प्रगतीचा आलेख सरळ वरच्या दिशेनं राहिला.

1997 ला बाळ बोठेचं लग्न झालं. या लग्नात शहरातील सगळे उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. या लग्नाची चर्चाही शहरात रंगली होती. याच काळात अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रात मोठ्या पदांवर मजल मारली. (Ahmednagar Rekha Jare Murder case Who is Bala Bothe)

बाळा बोठेने आतापर्यंत काय काय केलं, हे पाहिल्यावर त्याच्या प्रतिष्ठेची जाणीव तुम्हाला होईल!

तब्बल 28 वर्ष पत्रकारिता

8 पुस्तकं प्रकाशित, 3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर

नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी

तब्बल 16 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री

राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे 40 पुरस्कार

बाळ बोठे 40 हून अधिक देश फिरला, आलिशान बंगला, जमीन जुमला आणि महागड्या गाड्या

बाळ बोठेनं हे इतक्या लवकर कसं मिळवलं असा प्रश्न आता अनेकांना पडतोय…

हनी ट्रॅप आणि समझोता

गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर शहरात याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

आताही बाळा बोठे पोलिसांना चकवा देत आहे, जिथं तो असल्याची माहिती मिळते, तिथं छापा टाकल्यावर काहीही सापडत नाही…अगदी खबरीही पोलिसांना गुंगारा देत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील रेखा जरे हत्याकांड वाटतं तितकं सगळ-साधं आणि सोपं नक्कीच नाही.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

(Ahmednagar Rekha Jare Murder case Who is Bala Bothe)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.