तीन राज्यांमध्ये दहशत माजवणारा गुंड, सलमान खानलाही धमकी, कुख्यात आरोपीची दिल्ली सेल चौकशी करणार, पण…

पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई हा सध्या राजस्थानच्या अजमेर जेलमध्यै कैद आहे (Ajmer Jail have not manpower for to send Lawrence Bishnoi to delhi).

तीन राज्यांमध्ये दहशत माजवणारा गुंड, सलमान खानलाही धमकी, कुख्यात आरोपीची दिल्ली सेल चौकशी करणार, पण...
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:09 PM

जयपूर : पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई हा सध्या राजस्थानच्या अजमेर जेलमध्यै कैद आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने या कुख्यात गुंडाची कस्टडी मागितली आहे. मात्र, या कैद्याला दिल्ली घेऊण जाण्यासाठी लागणारा स्टाफ नाही, असं सांगत अजमेरच्या जेलरने आपली जबाबदारी झटकली आहे. खरंतर या कैद्याला पोलीसही घाबरतात, इतकी भयानक त्याची दहशत आहे (Ajmer Jail have not manpower for to send Lawrence Bishnoi to delhi).

जेलमध्ये बसून उत्तर भारतात दहशत निर्माण करण्याता प्रयत्न

खरंतर राजस्थानच्या अजमेर जेलमध्ये बंदी असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई हा जेलमध्ये राहून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. याबाबत गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. लॉरेन्स इतर गुंडांशी हातमिळवणी करुन दिल्ली, एनसीआरसर संपूर्ण उत्तर भारतात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.

अपुऱ्या मनुष्यबळा अभावी दिल्ली पाठवू शकत नाही : जेलर

काही दिवसांपूर्वी लॉरेन्सच्या टोळीतील काही गुन्हेगारांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल सतर्क झाली. पोलिसांनी दिल्ली कोर्टात अर्ज दाखल करत लॉरेन्सच्या चौकशीसाठी त्याला दिल्लीला आणण्याबाबतची मागणी केली. कोर्टाने पोलिसांना परवानगी दिली. मात्र, अजमेर जेलच्या जेलरने लॉरेन्सला दिल्लीला पोहोचवण्यास सांगितले तर त्यांनी हाथ वरती केले. आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याने लॉरेन्सला दिल्लीला पाठवू शकत नाही. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी किंवा दिल्ली पोलिसांनी फोर्स आणून त्याला घेऊन जावं, असं जेलरने म्हटलं आहे. आता दिल्ली पोलीस लॉरेन्सला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी कामाला लागले आहेत.

लॉरेन्स बिश्नोई नेमका कोण आहे?

लॉरेन्स बिश्नाई हा पंजाबच्या फजिल्ला येथील अबोहर भागात राहतो. खरंतर तो 2018 मध्ये देशभरात चर्चेत आला होता. कारण त्यावेळी त्याने बॉलिवूड स्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. याशिवाय काही शूटर सलमानच्या घराबाहेर रेकी करताना आढळले होते (Ajmer Jail have not manpower for to send Lawrence Bishnoi to delhi).

कॉलेजमध्ये असताना गुन्हेगारी विश्वात पाऊल, आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांची हत्या

लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. या घटनेनंतर त्याने अनेक लोकांना जीवे मारले, अनेकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्याने 007 नावाचा ग्रुप बनवला होता.

वडील पोलिसात, मुलगा गुन्हेगारी विश्वात

लॉरेन्सचे वडील पोलिसात होते. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. तो मोठमोठ्या व्यापाऱ्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडनी गोळा करायचा. जो खंडनी देण्यास नकार करायचा त्याची हत्या करण्यातही तो मागेपुढे बघायचा नाही. लॉरेन्सने आता जेलमध्ये कुख्यात गुंड काला जठेडीसोपबत हातमिळवणी केली आहे. ते दिल्लीत काहीतरी मोठं विपरित काम करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये बसूनही त्याचे काळे धंदे सुरुत आहेत.

हेही वाचा : बाळ हिरावून फसवणूक, रिअल लाईफ ‘कुसुम मनोहर लेले’सोबत घडलेलं भीषण वास्तव काय? ती महिला आज कुठेय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.