अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर टीका
नराधमाने एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधआमाला अटक केली.
अकोला | 20 नोव्हेंबर 2023 : अकोला शहरात गुन्हेगारीचा आलेख पुन्हा वर चढला आहे. शहरातून एका नृशंस गुन्ह्याची बातमी समोर आली आहे. नराधमाने एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूचा धाक दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हे तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिले. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या नराधमाला बेड्या ठोकल्या.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राल हादरवणाऱ्या या घटनेबाबत ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला. ं
नेमकं काय झालं ?
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ११ वर्षांची ही पीडित मुलगी कैलास टेकडी परिसरात राहते. पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. आणि चाकूचा धाक दाखवून त्याने पीडितेवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने तिला दिली. यामुळे हादरलेल्या त्या मुलीने कोणाकडेच तोंड उघडलं नाही. याच गोष्टीचा फायदा घेत त्या नराधमाने वारंवार त्या निरागस बालिकेचं शोषण केलं. त्याची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही, त्याने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिली. तसेच कात्रीच्या सहाय्याने तिचे केसही कापले.
दिवसेंदिवस आरोपीचा त्रास वाढतच चालल्याने, एकेदिवशी धीर करून पीडित मुलीने या घटनेची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. मुलीवर इतक दिवस अत्याचा झाल्याच कळताच तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर वंचित बहुजनक आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी खदान पोलिसांकडे केली. या संपूर्ण प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सुप्रिया सुळेंनीही केला निषेध
या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट जसेच्या तसे..
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार…
— Supriya Sule (@supriya_sule) November 20, 2023