Pune Suicide : आळंदीच्या नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेत आत्महत्या, घरगुती कारणातून उचलले टोकाचे पाऊल

प्रियांका घोलप आणि अभिषेक उमरगेकर यांचा 9 महिन्यापूर्वीच 16 नोव्हेंबर 2021 रोजी विवाह झाला होता. काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

Pune Suicide : आळंदीच्या नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेत आत्महत्या, घरगुती कारणातून उचलले टोकाचे पाऊल
आळंदीच्या नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेत आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 12:50 AM

पुणे : आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (Vaijyanta Umaragekar) यांच्या सुने (Daughter in law)ने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियांका अभिषेक उमरगेकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. घरगुती कारणातून प्रियांकाने आत्महत्या केली असल्याचे समोर आलंय. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आळंदी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. प्रियांका ही पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका कमल घोलप यांची कन्या आहे. प्रियांकाच्या आत्महत्येने उमरगेकर आणि घोलप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

9 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

प्रियांका घोलप आणि अभिषेक उमरगेकर यांचा 9 महिन्यापूर्वीच 16 नोव्हेंबर 2021 रोजी विवाह झाला होता. काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. प्रियंका आणि अभिषेक यांच्यात आज वाद झाला होता. मी आत्महत्या करते असं देखील प्रियांकाने धमकी दिली होती. त्यानंतर बेडरूमध्ये जाऊन 8 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.

मुलुंडमध्ये आईची हत्या करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलुंडमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून स्वतः लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. छाया महेश पांचाळ (46) असे मयत महिलेचे नाव असून जय पांचाळ (22) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मुलुंडच्या वर्धमान नगरमध्ये पांचाळ कुटुंबीय राहतात. काल संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांच्या घरातून रक्त येत असल्याचा कॉल प्राप्त झाला. यानंतर मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृत पडलेल्या आढळल्या. त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Alandi city president daughter-in-law commits suicide over family dispute)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.