व्हिडिओ कॉल, अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड, माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप

माजी पंतप्रधानांच्या नातवावर त्यांच्या घरी काम करणाऱ्या मेडने गंभीर आरोप केले आहेत. मेडने रेवन्नावर व्हिडिओ कॉल, अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड सारखे आरोप केले आहेत. रेवन्नाचे कथित लैंगिक शोषणाशी संबंधित आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ कॉल, अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड, माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
prajwal revanna
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 9:39 AM

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हासनचा JDS खासदार प्रज्वल रेवन्नाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कथित लैंगिक शोषणाशी संबंधित त्याचे आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रविवारी त्याच्या विरोधात FIR दाखल झाला आहेत. रेवन्नाच्या घरी काम करणाऱ्या महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. रेवन्नाशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओच्या तपासासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे.

तीन सदस्यीय SIT च नेतृत्व एडीजी (CID) विजय कुमार सिंह करणार आहेत. दोन अन्य सदस्य सुमन डी. पेनेकर (DG, CID) आणि मैसुरुच्या आयपीएस सीमा लाटकर या एसआयटीमध्ये आहेत. SIT ला लकवरच आपला तपास पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रज्वल रेवन्ना हासन लोकसभा क्षेत्रातून NDA चा उमेदवार आहे. इथे दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झालं होतं. हासनमध्ये रेकॉर्ड 77 टक्के मतदान झालं होतं.

कुठल्या कलमातंर्गत गुन्हा?

रेवन्नासमोर माजी मंत्री जी पुट्टस्वामी गौडा यांचे नातू श्रेयस एम पटेल यांचं आव्हान आहे. रेवन्ना विरोधात होलेनरासीपुर पोलीस ठाण्यात आयपीसीची कलम 354 A (लैंगिक शोषण), 354 D (पाठलाग करणं), 506 (आपराधिक धमकी) आणि 509 या कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिलेने काय म्हटलय?

SIT आता या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करेल. माजी पंतप्रधानांच्या नातवावर मेडने गंभीर आरोप केले आहेत. नोकरीवर लागल्यानंतर चार महिन्यानंतर रेवन्नाने लैंगिक शोषण सुरु केलं असा आरोप पीडित महिलेने केला आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या जीवाला धोका आहे असं पीडितेने म्हटलं आहे. पीडित महिला रेवन्नाच्या पत्नीला ओळखते.

रेवन्ना देशाबाहेर निघून गेला?

रेवन्नाचा हा आपत्तीजनक व्हिडिओ त्याच्या मतदारसंघात सुद्धा व्हायरल झाला होता. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असं रेवन्नाकडून सांगण्यात आलं. शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी रेवन्नाच्या आपत्तिजनक व्हिडिओचा तपास करण्यासाठी SIT स्थापित करण्याची घोषणा केली. रेवन्ना देशाबाहेर निघून गेल्याच बोललं जातय. लुफ्थांसा एअरलाइन्स तो जर्मनीला निघून गेल्याची माहिती आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.