सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष कोर्टाने मोठा दणका दिला आहे. (Ambani bomb scare: Sachin Vaze sent to NIA custody till 3rd April)

सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ
सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 5:23 PM

मुंबई: अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष कोर्टाने मोठा दणका दिला आहे. वाझेंच्या कोठीडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांना 9 दिवस एनआयएच्या ताब्यात राहावं लागणार आहे. (Ambani bomb scare: Sachin Vaze sent to NIA custody till 3rd April)

सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेंच्या कोठडीत नऊ दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

एनआयएची कोर्टाला धक्कादायक माहिती

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.

एनआयएचा युक्तिवाद

एनआयएने यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला दिली होती.

आणखी धक्कादायक माहिती मिळणार?

वाझेंवर यूएपीए लावण्यात आला आहे. त्यातच आता कोर्टानेही त्यांच्या कोठडीत वाढ केल्याने वाझेंकडून अजून काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा कट कसा रचला गेला. तसेच जिलेटीन आणून देण्यात कुणी कुणी मदत केली, याचीही माहिती एनआयएला मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली. (Ambani bomb scare: Sachin Vaze sent to NIA custody till 3rd April)

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(Ambani bomb scare: Sachin Vaze sent to NIA custody till 3rd April)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.