Video : अंबरनाथमध्ये चोराचं कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा, चोरीची स्टाईल बघून कपाळावर हात माराल

आता एक चोरीचा असा प्रकार समोर आलाय, ज्याचा व्हिडिओ (CCTV) बघून तुम्हीही कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. कारण चोरांनी बहाना केला एक आणि हात मारला दुसरीकडेच(Ambernath crime). हा चोर हंडा कळशी बघायला आला अन् सिलेंडर घेऊन गेला,

Video : अंबरनाथमध्ये चोराचं कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा, चोरीची स्टाईल बघून कपाळावर हात माराल
चोरांनी दुकानदाराला गंडवलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 6:30 PM

अंबरनाथ : अंबरनाथमधले (Ambernath Thief) चोर फक्त चोर नाहीत तर ओव्हरस्मार्ट चोर झालेत. कारण आता एक चोरीचा असा प्रकार समोर आलाय, ज्याचा व्हिडिओ (CCTV) बघून तुम्हीही कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. कारण चोरांनी बहाना केला एक आणि हात मारला दुसरीकडेच(Ambernath crime). हा चोर हंडा कळशी बघायला आला अन् सिलेंडर घेऊन गेला, ही चोरीची नवी स्टाईल पाहून दुकानदारही आवाक राहिला. गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्येही अशाच स्टाईल चोरी झाली होती. त्यामुळे या भागातले चोर दुकानदारांपेक्षा जास्त स्मार्ट झालेत का? असा सवाल उपस्थित झालाय. शिवाय या भागात गेल्या काही दिवसात चोरट्यांच्या रडारावर दुकानदार आहेत. दुकानात गेल्या अनेक दिवसात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

नेमका गुंगारा कसा दिला?

अंबरनाथ पश्चिमेच्या मातोश्री नगर भागात मदन पटेल यांचं विजय मेटल मार्ट हे दुकान आहे. या दुकानात एक चोरटा आला आणि त्याने हंडा कळशी दाखवायला सांगितलं. तसंच लग्नात बेत द्यायची असल्याने नवीन दाखवा, असंही सांगितलं. त्यामुळं दुकानदार नवीन हंडा कळशी आणण्यासाठी आत गेले असता या चोरट्याने दुकानात असलेला एक 5 किलोचा छोटा गॅस सिलेंडर उचलून त्याच्या ऍक्टिव्हा गाडीवर नेऊन ठेवला आणि तिथून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतायत.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्येही असाच प्रकार

या भागात या स्टाईलने चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका दुकानातही दुकानदाराला असाच गुंगारा दिला होता. चोरांनी दुकानदाराची चप्पल गल्लीत फेकून दिली. त्यानंतर तुमची चप्पल कुणीतरी फेकली असं सांगितलं आणि दुकानदार बाहेर जाताच त्याचा पूर्ण गल्ला साफ केला. काही दिवासांपूर्वीच या चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र पुन्हा त्याच स्टाईलनं चोरी झाल्याने दुकानदारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरलं आहे. अशा दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या थांबवण्याचं आवाहन पोलिसांसमोर असणार आहे.

Hariyana Suicide : हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

VIDEO : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत झाली कैद

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.