वीजजोडणी कापल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, अंबरनाथच्या रेल्वे पोलिसाचा प्रताप

अंबरनाथ : वीजबिल थकवल्यानं वीजजोडणी कापून गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला (Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee) रेल्वे पोलिसाने आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय (Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee For Disconnecting The Power Supply). अंबरनाथच्या राहुल इस्टेट परिसरात आनंद लोखंडे हे रेल्वे पोलीस […]

वीजजोडणी कापल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, अंबरनाथच्या रेल्वे पोलिसाचा प्रताप
Ambernath Railway Police
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:56 PM

अंबरनाथ : वीजबिल थकवल्यानं वीजजोडणी कापून गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला (Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee) रेल्वे पोलिसाने आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय (Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee For Disconnecting The Power Supply).

अंबरनाथच्या राहुल इस्टेट परिसरात आनंद लोखंडे हे रेल्वे पोलीस राहतात. त्यांनी नोव्हेंबर 2020 पासून वीजबिल न भरल्यामुळे महावितरणच्या आदेशानुसार टेक्निशिअन रुपेश जाधव यांनी शनिवारी त्यांची वीजजोडणी कापली. मात्र, काही वेळातच लोखंडे यांनी बिल भरल्यानंतर महावितरणने त्यांच्या टेक्निशिअनला लोखंडेची वीजजोडणी पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.

लोखंडेंनी परिवारासह रॉयल पार्क गाठलं

यावेळी टेक्निशिअन रुपेश जाधव हे रॉयल पार्क परिसरात काम करत असल्यानं यांनी त्यांच्या सहकाऱ्याला लोखंडे यांच्याकडे पाठवलं. मात्र, लोखंडे यांनी ज्यांनी आमची लाईट कापली त्यांनाच बोलवा असा आग्रह धरला. त्यानंतर रुपेश जाधव यांना त्यांच्या कॉल करुन ते कुठे आहेत, याची माहिती घेतली आणि लोखंडे हे त्यांच्या परिवारासह रॉयल पार्क परिसरात आले.

याठिकाणी त्यांनी महावितरणचे टेक्निशिअन रुपेश जाधव यांना शिवीगाळ करत दोन कानशिलात लगावल्या. तसेच, लोखंडेच्या मुलानेही जाधव यांना मारहाण केली, असा आरोप रुपेश जाधव यांनी केलाय.

गुन्हा फक्त मुलाविरोधात

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपेश जाधव यांनी तक्रार केली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः रेल्वे पोलीस लोखंडे आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याचा जाधव यांचा आरोप असतानाही गुन्हा मात्र फक्त आनंद लोखंडे यांचा मुलगा अमन लोखंडे याच्यावरच दाखल करण्यात आलाय. त्यामुळे रुपेश जाधवच्या आरोपांतरही आनंद लोखंडेचं नाव गुन्ह्यातून कुणी काढलं? असा प्रश्न उपस्थित झालाय (Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee For Disconnecting The Power Supply).

वीजजोडणी कापल्यानं महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा व्हिडीओ –

Ambernath Railway Police Beat Mahavitaran Employee For Disconnecting The Power Supply

संबंधित बातम्या :

बदलापुरात तरुणाची तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या, कारण वाचून तुम्हीही हादराल!

डोंबिवलीत लव्ह, सेक्स अँड धोका, बारमधील वेटरकडून बारबालेची हत्या

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.