महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल

महिलांवर नजर ठेवण्यासाठी आणि सुंदर मुलींना पाहण्यासाठी एका तरुणाने असं काही केलं की ज्याचा विचारही आपण करू शकणार नाही.

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 12:31 PM

टेक्सास : हल्ली सोशल मीडियाच्या या जगात काय होईल याचा नेम नाही. गुन्ह्यांपासून ते सायबर क्राईमपर्यंत अनेक धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहेत. अशात महिला अत्याचाराच्या घटनाही कमी नाहीत. आताही असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला आहे. कुठल्याच देशात महिला सुरक्षित नाही हे खरं आहे. पण असा काही प्रकार घडला आहे, जो वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेन. महिलांवर नजर ठेवण्यासाठी आणि सुंदर मुलींना पाहण्यासाठी एका तरुणाने तब्बल 200 घरांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते. (america home security technician admits hacking customers security cameras to see womens)

खरंतर, लोकांच्या घरांतील सीसीटीव्ही हॅक होत असल्याची प्रकरणं अमेरिकेच्या टेक्सास शहरातून समोर आली आहेत. इथली एक कंपनी टेक्निशियन सिक्योरिटी अलार्म सिस्टम नागरिकांना देते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एव्हिल्स नावाच्या एका कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचं कारणंही तितकंच गंभीर होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोर्टाच्या सुनावणीदरम्यान एव्हिल्सने कबूल केलं की तो सुंदर मुलींना पाहण्यासाठी त्यांच्या घरातील कॅमेरे हॅक करायचा. या प्रकरणात दोषी ठरल्यास एव्हिल्लास तब्बल 5 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

एका अहवालानुसार, 35 वर्षीय टेक्निशियन एव्हिल्सने ग्राहकांच्या 9600 वेळा ग्राहकांचं अकाऊंट हॅक केलं होतं. एव्हिल्सने त्याचा ईमेल आयडी देखील ग्राहकांच्या प्रोफाइलमध्ये जोडला होता. यातून तो ग्राहकांच्या सीसीटीव्ही कॅमेरा सहज हॅक करू शकत होता. त्याने अनेक तरुणींच्या घरातले कॅमेरे हॅक केले होते.

खरंतर, एव्हिल्सने ग्राहकांची परवानगी न घेता त्यांच्या खात्यामध्ये आपला ईमेल आयडी जोडला होता. टेक्सासच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एव्हिल्स आधी कोणत्या घरात सुंदर महिला राहतात याचा शोध घ्यायचा आणि त्यानंतर त्यांच्या घराचे कॅमेरे हॅक करायचा. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्याने अनेक महिलांचे खासगी व्हीडिओही शूट केले होते. (america home security technician admits hacking customers security cameras to see womens)

संबंधित बातम्या –

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

पोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

(america home security technician admits hacking customers security cameras to see womens)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.