नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

तू जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस, मला मानसिक त्रास होत आहे, म्हणून तू माझ्याजवळ येऊन राहिलास, असंही दीपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिलं आहे. (Deepali Chavan emotional letter to Husband)

नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पतीला लिहिलेलं भावनिक पत्र
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 10:02 AM

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी (RFO Deepali Chavan Suicide) पतीला लिहिलेले भावनिक पत्र समोर आले आहे. मी आपल्या बाळाला गमावलं, आपला परिवार अजून पूर्ण नव्हता झाला, आपल्या संसाराला नजर लागली. तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको करुस, नाहीतर ती माझ्यासारखी तुला वेळ देणार नाही, अशा दीपाली चव्हाणांनी लिहिलेल्या अनेक ओळी डोळ्याच्या कडा ओलावणाऱ्या आहेत. “मनिषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे” असा उल्लेख दीपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात आहे. त्यामुळे पत्रात उल्लेख असलेली ‘ती’ महिला कोण? तिचा दीपाली यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Amravati RFO Deepali Chavan emotional letter to Husband Rajesh Mohite before Suicide)

दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

प्रिय नवरोबा,

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. जिवापेक्षा जास्त काय करावं आता मी जीव देत आहे. तू रात्री मला खूप शांत केलंस. साहेब मला काय काय बोलले, ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतो, मी शांत राहते, पण जानू मला सहन होत नाही. तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरुन गेली. खरंच भरुन गेली माझ्या साहेबांनी मला पागल करुन सोडले. माझा इतका अपमान कधीच कुणी केला नाही, जितका शिवकुमार साहेब करतात.

मी खूप सहन केलंय पण आता माझी लिमिट खरंच संपली आहे. यावर उपाय असू शकतो, मी सुट्टी घेऊ शकते, पण सुट्टी देखील मंजूर करत नाही. पगार कापतो, तुझ्याशी बोलायचं होतं, मी तुझी वाट पाहत होते तू घरी यायची. आज आई पण गावी गेली, घरी कोणीच नाही, घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे, मला माफ कर. तू जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस, मला मानसिक त्रास होत आहे, म्हणून तू माझ्याजवळ येऊन राहिलास, पण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचा त्रास देणे कमी झालं नाही, मला त्याचा त्रास खूप आहे.

मला त्याच्या हाताखाली काम करावे लागणार म्हणून मी त्याच्या वागण्याची कधीच तक्रार केली नाही. तुला वाटतं मी तुझ्यापेक्षा खूप मोठ्या पदावर जावो, त्यासाठी तू प्रयत्न पण करत आहेस. पण मी खोट्या प्रकरणांमध्ये इतक्या वाईट फसले आहे, की मला बाहेर निघता येत नाही आहे. मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझं आयुष्य बरबाद केलं.

बाकी जाऊ दे, तू तुझी काळजी घे. तुझी म्हणजे तुझ्या पोटाची बरं. खूप व्यायाम कर नेहमीसारखा. माझ्यासारख्या आळशी नको. आईची व नितेशची काळजी घे, तूच सगळ्यांना सांभाळणार आहेस मला माफ कर. मी आपल्या बाळाला गमावलं. आपला परिवार अजून पूर्ण नव्हता झाला. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला नजर लागली आहे. तू तुझ्यासाठी सेटिंग करायला सुरुवात कर. माझ्या बोलण्याने मी तुला कधी दुखावलं असेल, तर मला माफ कर. तुझं लग्नाचं वय अजून गेलेलं नाही. तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको करु, नाहीतर ती पण माझ्यासारखी तुला वेळ देणार नाही. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.

माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार वनरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. मी मानसिक त्रासाला कंटाळून जीव देत आहे. माझे बँक पासबुक दागिने सर्व कपाटात आहे, सगळं माझ्या आईच्या ताब्यात देईन, माझं मंगळसूत्र आणि तू केलेला माझा नवीन हार तुझ्याकडे माझी आठवण म्हणून ठेव. आईला सुखरूप घरी पोहोचव, नितेशच्या लग्नात नाचायला मी नसेन, पण माझे आशीर्वाद नेहमीच त्याच्या पाठीशी असतील. आई मी रात्रीसुद्धा माहेरा सारखीच राहिली, माझ्याकडून कधी चूक झाली असेल तर मला माफ करा, ज्याने आयुष्यात आपला संसार अपूर्ण राहिला, पण पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करु, आय लव यू सो मच मला तुझ्या मिठीत राहायचं होतं कायम, आज सकाळी जाताना तुझी आणि माझी भेट झाली नाही, मला माफ कर मी तुझी साथ सोडून जात आहे, माझ्यासाठी तू सगळं सहन केलं, पण मी कमी पडत आहे माझी हार्ड डिस्क फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार आहे.

-दीपाली चव्हाण

(Amravati RFO Deepali Chavan emotional letter to Husband Rajesh Mohite before Suicide)

दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Amravati RFO Deepali Chavan wrote letter to Husband Rajesh Mohite before Suicide mentioned Manisha Uike)

फोनवरील वार्तालापाची ऑडिओ क्लीप

दरम्यान, RFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरुन जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कशाप्रकारे एकेरी भाषेत बोलतात. बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान त्यांना उरलेलं दिसत नाही. ही ऑडिओ क्लीप तुम्ही ऐकू शकता

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक, पोलिसांनी आरोपीला साखळी करुन कोर्टात नेलं

(Amravati RFO Deepali Chavan emotional letter to Husband Rajesh Mohite before Suicide)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.