तो प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला…आणि नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून…

नाशिकच्या येथे इंदिरानगर येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

तो प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला...आणि नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 11:23 AM

नाशिक : मुलं पळवणारी टोळी समजून मारणीच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियावर (Social Media) मुलं पळवणारी टोळीचा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिक (Citizen) प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) आठवडाभरात पाच जणांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील मारहाणीच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच ही घटना घडल्याने पोलीस दलाची चिंता वाढली आहे.

नाशिकच्या येथे इंदिरानगर येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकच्या गंजमाळ येथेही बॅग पळवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या वेळी घडली होती.

मागील आठवड्यात टाकळी रोड परिसरात ब्लँकेट विक्रेत्यांनी आपल्याशी खेळत असलेल्या मुलांनी खोडसाळपणा केल्याने बाचाबाची झाली त्या दरम्यान नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण केली होती.

आठवडाभरातच या तीन घटनांमध्ये पाच जणांना सोशल मीडियाच्या व्हायरल मेसेजने बेदम मारहाण खाण्याची वेळ आली, तिन्हीही घटनांमध्ये पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

इंदिरानगर येथील घटनेत तर पोलीसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याने घटना लागलीच लक्षात आली अन्यथा तिथिल नागरिकांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती.

सोशल मीडियावर मुलं पळवणाऱ्या फेक मेसेजला मोठे पेव फुटले आहे, अनेक जन तो व्हायरल करत असल्याने त्याचा इतरांनाच मोठा फटका बसू लागला आहे.

मुलं पळवणाऱ्या टोळीबाबतच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका असे पोलीसांकडून आवाहन करून वारंवार घटना घडत असल्याने पोलीस खात्याची डोकेदुखी वाढली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.