क्षुल्लक कारणातून वाद टोकाला गेला, तरुणासोबत जे घडले ते भयंकर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

क्षुल्लक कारणातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत तरुण मदतीसाठी याचना करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्षुल्लक कारणातून वाद टोकाला गेला, तरुणासोबत जे घडले ते भयंकर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कल्याणमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:53 PM

सुनील जाधव, कल्याण : क्षुल्लक वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याण पूर्वेकडील नवी गोविंदवाडी परिसरातील बीएसयूपी प्रकल्पातील एका इमारतीत ही घटना घडली आहे. साजिद शेख असं जखमी तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर जखमी तरुण मदतीसाठी विव्हळत होता. मात्र लोक व्हिडिओ बनवत होते. तरुणाचा तडफडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर काही दक्ष नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी टिळक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अर्धातास तरुण मदतीसाठी विव्हळत होता

कल्याण पूर्वेकडील नवी गोविंदवाडी परिसरातील बीएसयूपी प्रकल्पातील एका इमारतीच्या घरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. हल्ल्यानंतर जखमी तरुण तब्बल अर्धा तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी ओरडत होता. परिसरातील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना देत तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बीएसयूपी प्रकल्प बनताहेत गुन्हेगारीचा अड्डा

सध्या तरुण हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून, डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र लोकांच्या विकासासाठी बांधलेले हे बीएसयूपी प्रकल्प गुन्हेगारीचा अड्डा बनला असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इमारतीत नशा करण्यासाठी येणाऱ्या तरुणांकडून या परिसरातील महिला त्रस्त आहेत. आता या इमारतीत रक्ताची होळी खेळली जात आहे. आता तरी प्रशासन जाग होईल का? असा सवाल करत संतप्त रहिवासी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ला करणारा एक आहे की अनेक याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. तपासाअंती सर्व सत्य उघड होईल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.