विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार, RJ अनन्या कुमारी राहत्या घरी मृतावस्थेत

अनन्या कुमारी अॅलेक्स ही कोल्लम पेरुमन भागात राहत होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार ठरली होती.

विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार, RJ अनन्या कुमारी राहत्या घरी मृतावस्थेत
Anannyah Kumari Alex
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 2:07 PM

तिरुअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी अॅलेक्स (Ananya Kumari Alex) राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोच्चीमधील घरात अनन्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकीही होती.

आत्महत्या केल्याचा संशय

अनन्याने 2020 मध्ये कोच्चीमधील खासगी रुग्णालयात वजायनोप्लॅस्टी शस्त्रक्रिया केली होती. मात्र वर्षभरानंतरही तिला आरोग्याच्या कुरबुरी जाणवत होत्या. ती दीर्घ काळ एका जागी उभी राहू शकत नसे. शारीरिक तक्रारींमुळे तिला काम करण्यात अडथळे येत होते. याच कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शस्त्रक्रियेत चुका झाल्याचा दावा

शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तिचे पार्थिव एर्नाकुलम शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीत पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार

अनन्या कुमारी अॅलेक्स ही कोल्लम पेरुमन भागात राहत होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार ठरली होती. 2021 मधील निवडणुकीत ती मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होती. डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पक्षाकडून तिने प्रचाराला सुरुवात केली. मात्रा आपल्या पक्षातील नेत्यांनी धमकी आणि छळ केल्यामुळे तिने माघार घेतली होती.

विधानसभा निवडणुकीत तिने केलेला प्रचार :

अनन्या कुमारी ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी होती. तिच्या मित्र-मैत्रिणींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

पुरोगामी महाराष्ट्रात तृतीय पंथीयांसाठी पहिलं आश्रम सुरु, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य

(Anannyah Kumari first transgender Assembly Election Candidate in Kerala found dead in Kochi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.