VIDEO : औरंगाबादमध्ये तरुणांचा राडा, बारमधलं गाणं बंद केल्याचा राग, हॉटेल व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

औरंगाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. रात्रीचे दहा वाजले म्हणून बारमधील म्युझिक आणि गाणं बंद केलं म्हणून काही तरुणांच्या टोळक्याने एका हॉटेल व्यवस्थापकाला प्रचंड मारहाण केली.

VIDEO : औरंगाबादमध्ये तरुणांचा राडा, बारमधलं गाणं बंद केल्याचा राग, हॉटेल व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
औरंगाबादमध्ये तरुणांचा राडा, बारमधलं गाणं बंद केल्याचा राग, हॉटेल व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 5:41 PM

औरंगाबाद : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने राज्यातील अटी आणि शर्थी अंतर्गत हॉटेल आणि बार सुरु केले आहेत. त्यानुसार रात्री दहा वाजता हॉटेल किंवा बार बंद होणं अपेक्षित आहे. पण औरंगाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. रात्रीचे दहा वाजले म्हणून बारमधील म्युझिक आणि गाणं बंद केलं म्हणून काही तरुणांच्या टोळक्याने एका हॉटेल व्यवस्थापकाला प्रचंड मारहाण केली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही अचूकपणे कैद झाली आहे. एकीकडे कोरोनाचं सावट सुरु आहे. दुसऱ्याकडे बार सुरु ठेवण्यासाठी तरुणांनी अशाप्रकारे धिंगाणा घातल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही औरंगाबादच्या हडको परिसरात गुरुवारी (2 सप्टेंबर) रात्री उशिरा घडली आहे. या परिसरातील लोटस बारमध्ये हॉटेल व्यवस्थापकाने रात्रीचे 10 वाजल्याने कर्मचाऱ्यांना हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनांनुसार बारमध्ये सुरु असलेली गाणी आणि म्युझिक बंद करण्यात आली. पण याच गोष्टीचा राग तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांना आला. त्यांनी गाणं बंद का केलं म्हणून प्रचंड गदारोळ सुरु केला.

टोळ्याचा हॉटेल व्यवस्थापकावर हल्ला

गाणं का बंद केलं म्हणून एका टोळक्याने हॉटेल व्यवस्थापक दिलीप उचित यांच्यासोबत वाद घातला. यावेळी उचित यांनी बार बंद करण्याची वेळ झाली असल्याने सर्वांना निघून जाण्यास सांगितलं. पण आरोपी नडून बसले. त्यांनी थेट हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी शब्दाने शब्द वाढला. त्यानंतर आरोपींनी थेट हॉटेल व्यवस्थापकावर हल्ला केला.

सीसीटीव्हीत मारहाणीची घटना कैद

आरोपींना हॉटेल व्यवस्थापकाला धक्का मारत, मारहाण करत बारमधून बाहेर खेचलं. त्यानंतर बारबाहेर त्यांना प्रचंड मारहाण केली. यावेळी आरोपींनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. विशेष म्हणजे आरोपींनी फक्त हॉटेल व्यवस्थापकच नाही तर इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मारहाणीत हॉटेल व्यवस्थापक जखमी

आरोपी फक्त एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला जमिनीवर खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी टोळीतील एकाने थेट कंबरेतील बेल्ट काढून हातात घेतला. त्यानंतर प्रचंड शिवीगाळ करत बेल्टने मारहाण केली. या मारहाणीत हॉटेल व्यवस्थापक दिलीप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचे हाड मोडले आहे. तसेच डोळ्यांच्या खालील बाजूसही इजा झाली आहे.

घटनेचा थरार बघा :

हेही वाचा :

महिलेसोबत कोण राहायचं, त्याने महिलेला का संपवलं? पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले, अखेर साऱ्याच गोष्टींचा उलगडा

आधी पप्पांना गाडीने उडवलं सांगितलं, नंतर वडिलांच्या हत्येची कबुली, तरुणाने असं का केलं?

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.