Arvind Kejriwal Arrest | केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
अण्णा हजारे यांच्यामुळे अरविंद केजरीवालांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. एकवेळ अण्णा हजारे हे अरविंद केजरीवाल यांना गुरुस्थानी होते. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने कथित दारु घोटाळा प्रकरणात अटक केली. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांमध्ये संतापाची भावना आहे. केजरीवाल यांच्या अटकेवर आता समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व आहे. अण्णा हजारे यांच्यामुळे अरविंद केजरीवालांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. एकवेळ अण्णा हजारे हे अरविंद केजरीवाल यांना गुरुस्थानी होते. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अण्णांना केजरीवालांचा हा निर्णय पटला नाही. त्यांनी केजरीवालांवर बऱ्याचदा टीका सुद्धा केली.
अण्णा हजारे यांनी आता केजरीवालांच्या अटकेवर टिप्पणी केली आहे. “कधी काळी आम्ही दोघे दारु आणि भ्रष्टाचारा विरोधात एकत्र होतो. आज तो स्वत: दारु बनवत होता. अरविंदने कधीच माझ ऐकलं नाही. याच मला दु:ख आहे” असं अण्णा हजारे म्हणाले.
काय म्हणाले अण्णा हजारे?
अण्णा हजारे म्हणाले की, मी अनेकवेळा केजरीवालांना दारु धोरण बंद कराव यासाठी पत्र लिहिली. दारु धोरणावर पत्र लिहिण्यामागे माझा उद्देश अन्याय संपवण्याचा होता. दारुच्या कारणांमुळे लोकांच्या हत्येची प्रकरण वाढतात. महिलांवर अत्याचार वाढतो. म्हणून मी दारु धोरण बंद करण्याची मागणी केलेली. पण अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलच नाही. त्याने दारु धोरण सुरु केलं. अखेर आज त्या दारुमुळेच त्याला अटक झालीय असं अण्णा हजारे म्हणाले.