हैदराबाद हॉरर किलिंगच्या घटनेनं पुन्हा हादरलं! भररस्त्यात चाकूहल्ला, तरुणाची निर्घृण हत्या

Hyderabad horror killing : दहा पेक्षा जास्त वेळा नीरजला चाकूने भोसकण्यात आलं. यात नीरज गंभीररीत्या जखमी झाला.

हैदराबाद हॉरर किलिंगच्या घटनेनं पुन्हा हादरलं! भररस्त्यात चाकूहल्ला, तरुणाची निर्घृण हत्या
प्रेमविवाहाला विरोध आणि हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 11:37 AM

हैदराबाद : हैदराबादेत (Hyderabad) हॉरर किलिंगची (Horror Killing) एक घटना ताजी असताचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हैदराबादेत भर बाजारात एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. पाच जणांनी मिळून या तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीतही (CCTV Video) कैद झाली आहे. दीड वर्षापूर्वी या तरुणानं प्रेम विवाह केला होता. या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी या मुलाची हत्या केली असल्याचा संशय आता बळावला आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचाराआधीच या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानं एकच खळबळ उडाली. हत्या करण्यात आलेल्या तरुमाचं नाव नीरज असल्याचं समोर आलंय. हैदाराबादच्या साहिनाथगंज पोलीस स्थानकातील बेगम बाजारातील मच्छी मार्केटमध्ये हे हत्याकांड घडलं.

नीरज आणि संजना यांनी दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता संजनाच्या कुटुंबीयांना या प्रेमविवाहाला विरोध होता. प्रेमविविहानंतर संजनाचे कुटुंबीय नाराज झाले होते. त्यांनी हा विवाह स्वीकारला नव्हता. दरम्यान, आता नीरजवर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यामागे संजनाच्या कुटुंबीयांचाच हात असल्याचा आरोप नीरजच्या नातलगांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

नेमकं घडलं काय?

हैदराबादमध्ये असलेल्या साहिनाथगंज इथल्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक मच्छी मार्केट आहे. या मच्छी मार्केटमध्ये नीरजवर पाच लोकांनी हल्ला केला. दोन बाईक्सवर पाच लोकं आली होती. त्यांनी नीरजवर चाकूने सपासप वार केले. दहा पेक्षा जास्त वेळा नीरजला चाकूने भोसकण्यात आलं. यात नीरज गंभीररीत्या जखमी झाला.

पाहा व्हिडीओ :  चंद्रपुरात वाघाचा वृद्ध इसमावर हल्ला

गंभीररीत्या जखमी झालेल्या नीरज रक्ताच्या थारोळ्यात पडला बोता. नीरजवरील हल्ल्यानं संपूर्ण मार्केटवर दहशत पसरली होती. हल्ल्यानंतर पळ काढणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालेत. दरम्यान, नीरजवर हल्ला होत असताना, हल्लेखोरांना रोखण्याची एकालाही हिंमत झाली नाही. हल्लेखोर पळून गेल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती मिळाली.

पाहा व्हिडीओ :

कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नीरजचा जीव वाचवण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा जीव गेला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेतलाय. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकंही तैनात केली आहे. याप्रकरणी तातडीनं कारवाई करत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करावी, यासाठी बेगम बाजारातील व्यापाऱ्यांनी निदर्शनंही केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.