अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश

अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे करण्यात आली होती.

अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश
अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:56 PM

औरंगाबाद : शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश आता ईडीनं दिले आहेत. जालना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निर्बंध लावण्याचे आदेश ईडीनं दिले असल्यानं खोतकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंधही घालण्यात आलेत. या संपूर्ण प्रकरणी ईडी चौकशी सुरू असल्यामुळे निर्बंध लावण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी सुरु आहेत. रामनगर साखर कारखाना गैरव्याहर प्रकरणी अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी (ED Inquiry) केली जाते आहेत. ही चौकशी सुरु असतानाच आता साखर कारखान्यावर (Suger Factory) निर्बंध लावण्याचे आदेश देण्यात आल्यानं अर्जुन खोतकर यांच्या अडचणी आणखी वाढल्यात.

100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली असल्याचं नोव्हेंबर 2021मध्ये म्हटलं होतं. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन कारखान्याचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. कारखान्याची 100 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सोमय्या म्हणाले होते. त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्जुन खोतकर यांची 100 कोटीचा कारखाना आणि 1 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली होती.

अर्जून खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली होती. जालन्यात दोन ठिकाणी सक्तवसुली संचलनालयातर्फे धाडी टाकण्यात आल्या होत्या.

सोमय्यांच्या आरोपांनंतर EDची तत्काळ कारवाई

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी 26 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले होते. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली होती. यावेळी अर्जुन खोतकर घरीच होते.

औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. यापूर्वी खोतकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात असल्याचंही खोतकरांनी म्हटलं होतं. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं स्पष्टीकरण खोतकरांनी त्यावेळी दिलं होतं.

संबंधित बातम्या :

‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

ब्लॅकमेलिंग, तपास यंत्रणेचा दुरुपयोग हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंची टीका

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.