तिची ही चूक महागात पडली, अनैतिक प्रेमसंबंधातून प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या

एका तरुणाने अनैतिक संबंधातून एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी या घटनेनंतर लागलीच पळून गेला. परंतू पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तिची ही चूक महागात पडली, अनैतिक प्रेमसंबंधातून प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या
crime scene
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 3:51 PM

अनैतिक संबंधातून एका तरुणाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणाला पोलिसांनी अखेर गुप्त माहिती आधारे अटक केली आहे. या महिले सोबत आरोपी तरुणाचे अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. आरोपीने हत्या करुन शहरातून पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे. सकाळी घटलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी सकाळी एका तरुणाने अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची अत्यंत निघृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दुर्दैवी महिलेचे नाव संगीता पिराजी शिंदे असे आहे. तिच्या सोबत आरोपी किरण कोळी उर्फ लहान्या या तरुणाचे अनैतिक संबंध होते. तिच्याशी आज सकाळी झालेल्या वादानंतर तिला आरोपी लहान्या याने बेदम मारहाण केली. तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला होता. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून तिचे आरोपी तरूणासोबत अनैतिक संबंध होते असे सूत्रांनी सांगितले.

आईला शिवीगाळ केल्याने…

शहापूर पुरा येथे राहणारी 36 वर्षीय महिला संगीता शिंदे हीच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ही महिला सध्या एकटी राहत असून तिचे लहान्या ऊर्फ किरण कोळी याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मात्र आज सकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मयत महिला आरोपीच्या आईला शिवीगाळ करू लागली. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करीत तिची त्याने हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण कोळी याला अटक केल्याचे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.