AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाराम बापू आणखी अडचणीत, लैंगिक अत्याचार आरोपात कोर्टाकडून गुन्हा सिद्ध, पाहा काय शिक्षा होणार

2002 ते 2005 दरम्यान आसारामने वेळोवेळी बलात्कार केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले होते. या घटनेप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आसाराम बापू आणखी अडचणीत, लैंगिक अत्याचार आरोपात कोर्टाकडून गुन्हा सिद्ध, पाहा काय शिक्षा होणार
आसाराम बापूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:55 PM

सूरत : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2013 मधील बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले असून, उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय मंगळवारी सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार आहे. सुनावणी बराच काळ या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुरतमधील दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 2013 मध्ये आसाराम बापूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघी बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप

2002 ते 2005 दरम्यान आसारामने वेळोवेळी बलात्कार केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले होते. या घटनेप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने यापैकी सहा आरोपींना निर्दोष मानले आणि आसारामला दोषी ठरवले.

आसाराम बापू अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांना आरोपी करण्यात आले होते. या सर्वांची काही काळापूर्वी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. आता त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना बलात्कार झाल्याचे मुलींनी सांगितले. अहमदाबाद येथील आश्रमात आपल्यावर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप मोठ्या बहिणीने केला होता.

जोधपूर न्यायालयाने त्यांना एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये त्याने जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.

आसारामचा मुलगा नारायण साईवरही बलात्काराचा आरोप

या प्रकरणात आसारामवर सुरतच्या दोन मुलींनी बलात्काराचा आरोप केला होता. लहान बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने आरोप योग्य ठरवत आसाराम बापूला दोषी ठरवले.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.